वाळूज परिसरातून ट्रक पळविला

By Admin | Updated: September 23, 2014 01:39 IST2014-09-23T01:22:20+5:302014-09-23T01:39:24+5:30

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ट्रक लांबविल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे

The truck escaped from the Walas area | वाळूज परिसरातून ट्रक पळविला

वाळूज परिसरातून ट्रक पळविला


वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ट्रक लांबविल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
सय्यद मुसा सय्यद उस्मान (५२, रा. धोंदलगाव ता. वैजापूर) हे ट्रकचालक आहेत. ११ सप्टेंबरला सय्यद मुसा हे ट्रक क्रमांक एम.एम.- ३५, के.- ०३५१ घेऊन वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कोकाकोला या कंपनीत गेले होते. मात्र, माल भरण्यासाठी नंबर न आल्यामुळे सय्यद मुसा कंपनीजवळच ट्रक उभा करून घरी निघून गेले होते.
१८ सप्टेंबरला कंपनीत माल भरण्यासाठी ट्रकचा नंबर आल्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सय्यद मुसा यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे १८ सप्टेंबरला सय्यद मुसा हे कंपनीत आले असता त्यांना आपला ट्रक गायब असल्याचे दिसून आले.
ट्रकचा शोध लागत नसल्यामुळे अखेर त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात २ लाख २० हजार रुपयांचा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दिली.
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर पायगव्हाणे करीत आहेत.

Web Title: The truck escaped from the Walas area