घोसला :(ता. सोयगाव ) घोसला-पाचोरा एसटी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर घडक होऊन झालेल्या अपघातात 15 प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास साखर कारखान्याजवळ घडली.
घोसला येथे मुक्कामी येणारी पाचोरा बस (एमएच १४ बि. टी. १६१८) मंगळवारी सकाळी 6 च्या सुमारास घोसला येथून निघाली. घोसलापासून 25 किलो मीटर अंतरावर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा साखर कारखान्याजवळ या बसची ट्रकशी एम एच १९ सी.वाय ७५२१ ) समोरासमोर घडक झाली. या अपघातात बसमधील 15 प्रवासी जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी पाचोरा रुग्णालयात जखमीना दाखल केले आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.