ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक, इंडिकामधील तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 11:29 IST2017-09-06T11:27:38+5:302017-09-06T11:29:24+5:30
भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात इंडिका कारमधील तीन जण ठार झाल्याची घटना घडली.

ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक, इंडिकामधील तिघांचा मृत्यू
गेवराई, दि. 6 - भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात इंडिका कारमधील तीन जण ठार झाल्याची घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावरील रांजणी जवळ घडली. यात इंडिका कारचा चक्काचूर झाला असून या प्रकरणी गेवराई ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
अविनाश गव्हाणे वय 36 राहणार टाकळगाव ,बजरंग ढोने वय 35 दादाराव मुजांळ , वय 34 दोघे राहणार हिरापूर असे अपघातात ठार झालेल्याची नावे असून तालुक्यातील हिरापूर येथून गेवराईकडे निघालेली इंडिका कार क्र- एम.एच.43 डी.1188 व औरंगाबादहून बीडकडे भरधाव वेगाने येत असलेला ट्रक क्र-एम.एच.20 ए.टी.9797 यांची समोरासमोर धडक झाली.
यामध्ये इंडिका कार मधील एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी असल्याने त्याना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना ते दोघे ठार झाले. या झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत.या प्रकरणी गेवराई ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.