शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

बिलोली तालुक्यातील २८ तलावांत ठणठणाट

By admin | Updated: July 23, 2014 00:22 IST

राजेश गंगमवार, बिलोली तालुक्यातील निजामकालीन २८ मालगुजारी तलावांतील जलसाठा समाप्त झाला आहे़ ऐन पावसाळ्यात जनावरांसाठी पाणीप्रश्न निर्माण झाला

राजेश गंगमवार, बिलोलीतालुक्यातील निजामकालीन २८ मालगुजारी तलावांतील जलसाठा समाप्त झाला आहे़ ऐन पावसाळ्यात जनावरांसाठी पाणीप्रश्न निर्माण झाला असून खेड्यापाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ मागच्या दोन महिन्यांत अत्यल्प पाऊस झाल्याने तलावात जलस्तर वाढलाच नाही़तालुक्यात निजामकालीन तलावांची संख्या २८ आहे़ प्रामुख्याने निजामाच्या राजवटीत निर्माण केलेल्या तलावांची देखरेख जवाबदारी सध्या जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाकडे आहे़ बिलोली शहरात दोन तलाव असून त्या पाठोपाठ कुंडलवाडी येथेही दोन मोठे तलाव आहेत़ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग व्हावा असा उद्देश होता़ गाव पातळीवर जनावरांच्या पाण्यासाठी सोय होत होती़ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तलावांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे गेले़ मागच्या पाच वर्षात लोकसहभाग अंतर्गत तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता़ परिणामी जलस्तर वाढवण्यासाठी मदत झाली़ योगायोगाने गतवर्षी मोठा पाऊस झाला़ मागच्या पावसाळा हंगामात ९७० मि़मी़ पाऊस झाला जो की सरासरी पर्जन्यमानपेक्षा जास्तीचा होता़ पावसाळा जास्त झाल्याने प्रत्येक तलावातील पाणी वाढले़ विशेष म्हणजे, याच वर्षात बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न निकाली लागला, त्यामुळे जमिनीतील जलस्तर उंचावला व तलावाची पाणीपातळी स्थिर राहिली़ तालुक्याला गोदावरी व मांजरा नदीचा वेढा आहे़ त्यामुळे तलावांची पाणीपातळी टिकून राहते़ गतवर्षीच्या अतिवृष्टीसारख्या पावसामुळे उन्हाळ्यातही तलाव भरून राहत आले़ आता मागच्या दीड-दोन महिन्यातील पाणीवापर, अत्यल्प पाऊस त्याचप्रमाणे बाभळीचा तेलंगणातील विसर्ग त्यामुळे जवळपास सर्वच तलाव कोरडेठाक पडले आहेत़ तालुक्यात बिलोली, कुंडलवाडी, अर्जापूर, बडूर, हिंगणी, दर्यापूर, भोसी, आळंदी, सावळी, मिनकी, सगरोळी, आंजनी, बामणी, केरूर, पिंपळगाव अशा २८ तलावांतील पाणीस्थिती गंभीर झाली आह़े़ पावसाळ्यातच जलसाठा वाढतो पण अतिशय कमी पाऊस झाल्याने जलस्तर वाढण्यात आला नाही़ सध्या सर्वच तलाव कोरडेठाक पडले आहेत़ तलावातील भाग आता कोरडवाहू शेतीप्रमाणे दिसत आहे़काही मोठ्या तलावात कुठेतरी पाणी दिसून येते़ तेथे बेधडक मोटार लावून अनधिकृत शेती करण्यात येत आहे़ बिलोलीच्या १०० एकर तलावाचा भाग अतिक्रमणधारकांनी वेढला असून पाटबंधारे विभाग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे़ पावसाळ्यात उन्हाळ्याप्रमाणे स्थिती असून दरवर्षी पाण्याने भरून दिसणारे सर्व तलाव रिकामे दिसत आहेत़