दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: April 7, 2015 01:20 IST2015-04-07T00:41:03+5:302015-04-07T01:20:42+5:30
जालना : जिल्ह्यात विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या साहेबराव उर्फ साहेब्या रामा पवार (रा. गेवराई, जि. बीड) यासह त्याचा साथीदार

दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या जाळ्यात
जालना : जिल्ह्यात विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या साहेबराव उर्फ साहेब्या रामा पवार (रा. गेवराई, जि. बीड) यासह त्याचा साथीदार देसाई रामा जाधव (खामगाव, ता. गेवराई) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने रविवारी अटक केली आहे.
साहेबराव व देसाई रामा या दोघांवर जिल्ह्यात आष्टी, घनसावंगी व जाफराबाद या पोलिस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना स्थागुशाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना खबऱ्याकडून वरील दोन्ही आरोपींबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी करकम जि. सोलापूर येथे जाऊन सापळा रचला. या सापळ्यात दोन्ही आरोपी अडकले.
या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून आष्टी येथे दरोड्यातील गुन्ह्यात ६७ हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, शेख अजीम, अर्जुन पवार, कल्याण आटोळे, सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, सचिन चौधरी, दीपक पाटील, सागर बावीस्कर, वैभव खोकले यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)