कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 07:56 AM2019-09-08T07:56:55+5:302019-09-08T07:58:28+5:30

त्रिपूरा येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा छपाईच्या कंत्राटात 10 टक्के कमिशन मागण्याचा आणि कंत्राटदाराच्या घरीच पैसे स्विकारतानाचे स्टिंग ऑपरेशन त्रिपुरातील एका वृत्तवाहिनीने केले.

Tripura University VC Resigns After Sting Operation Shows Him Accepting Bribe | कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा

कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा

googlenewsNext
ठळक मुद्देत्रिपूरा येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा छपाईच्या कंत्राटात 10 टक्के कमिशन मागण्याचा आणि कंत्राटदाराच्या घरीच पैसे स्विकारतानाचे स्टिंग ऑपरेशन एका वृत्तवाहिनीने केले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने डॉ. धारूरकर यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. धारूरकर यांनी शनिवारी (7 सप्टेंबर) राजीनामा दिला आहे.

औरंगाबाद - त्रिपूरा येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा छपाईच्या कंत्राटात 10 टक्के कमिशन मागण्याचा आणि कंत्राटदाराच्या घरीच पैसे स्विकारतानाचे स्टिंग ऑपरेशन त्रिपुरातील एका वृत्तवाहिनीने केले. याविषयी राष्ट्रीय वृत्तपत्र ‘द हिंदू’मध्ये बातमी छापण्यात आली. ही बातमी आणि पैसे स्विकारतानाचा व्हिडिओ शुक्रवारी (6 सप्टेंबर) महाराष्ट्रभर व्हायरल झाला होता. तसेच यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने डॉ. धारूरकर यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी शनिवारी (7 सप्टेंबर) राजीनामा दिला आहे. त्यानंतर कुलगुरुपदाचा पदभार डॉ. संग्राम सिन्हा यांनी स्वीकारला आहे. 

त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. धारूरकर यांचे ‘व्हॅनगार्ड न्यूज’ या स्थानिक वृत्त वाहिनीने ‘ऑपरेशन व्हाईट कॉलर’ नावाने स्टिंग केले. 14 लाख रुपयांच्या प्रिटिंगच्या बिलाचा धनादेश आज मिळणार आहे. त्याचे पैसे आज द्या आणि 5 लाख 80 हजार रुपयांच्या प्रिंटिंगच्या वर्क ऑर्डरचे पैसे पुढच्या महिन्यात दिले तरी चालतील. 60 लाख रुपयांच्या वर्क ऑर्डरचे 10 टक्केप्रमाणे पैसे द्यावे लागतील,असेही बोलताना डॉ. धारूरकर व्हिडीओमध्ये दिसत आहेत.  यामध्ये एवढी मार्जीन नाही सर, असे सांगत प्रिंटिंग फर्मचा प्रतिनिधी लाचेची रक्कम कमी करण्याची विनंती करतो आणि रखीए सर म्हणत पैशांचे बंडल डॉ. धारूरकर यांचया हातात देतो. 

डॉ. धारूरकरांसोबत असलेली एक व्यक्ती लाचेची ही रक्कम बॅगेत ठेवतानाही या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे. हे स्टिंग डॉ. धारूरकर यांच्या कुलगुरू कार्यालयातील अँटिचेबर आणि प्रिंटिंग फर्मचे प्रतिनिधी सुरेंद्र सेठीया यांच्या कोलकात्यातील निवासस्थानी करण्यात आल्याचा दावाही यात केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना व्हॅनगार्ड वृत्तवाहिनीचे संपादक सेवक भट्टाचार्जी  म्हणतात की, डॉ. धारुरकर हे त्रिपूरा विद्यापीठात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा आणि लौकीक अबाधित राखण्यासाठी आम्ही व्हिसलब्लोअर म्हणून काम करत आहेत. याविषयीचा व्हिडिओ आणि पोस्ट फेसबुक, व्हाटस्अपवर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. यावर मोठ्या प्रमाणात चर्चाही करण्यात येत आहे. 

या व्हिडीओनंतर देशभरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने डॉ. धारूरकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवून गुन्हे दाखल करीत चौकशीची तयारी सुरू केली होती. यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा पर्याय निवडला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. याविषयी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

Web Title: Tripura University VC Resigns After Sting Operation Shows Him Accepting Bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.