शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलनाच्या फेऱ्या कागदावरच

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : महापालिका कचरा संकलनात पूर्णपणे अपयशी ठरत असून, कचरा संकलित करून नारेगाव डेपोपर्यंत नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांत कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण होत असल्याची शक्यता बळावली आहे

औरंगाबाद : महापालिका कचरा संकलनात पूर्णपणे अपयशी ठरत असून, कचरा संकलित करून नारेगाव डेपोपर्यंत नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांत कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण होत असल्याची शक्यता बळावली आहे. मनपा आणि खाजगी वाहनांच्या किती फे ऱ्या होतात. याबाबत काहीही नोंद यांत्रिकी विभागाकडे नसल्याची माहिती समोर आली आहे. वर्षाला १२ कोटी रुपयांचा खर्च खाजगी रिक्षा, ट्रॅक्टर, टिप्परच्या फेऱ्यांवर, तर पालिकेच्या टिप्पर दुरुस्तीवर १ कोटींहून अधिक खर्च होऊनही शहरात कचऱ्यांचे ढीग कायम आहेत. नोव्हेंबर २०११ पासून मनपामार्फत कचरा संकलनाचे काम सुरू आहे. मनपात १,७०० च्या आसपास सफाई कर्मचारी आहेत. त्यातील अर्धे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर आहेत. रोज ५०० मेट्रिक टन कचरा उत्सर्जित होतो. पालिकेला सुमारे ४ हजार सफाई कर्मचाऱ्यांची गरज आहे.कचऱ्याचे टिप्पर उशिरा निघत असल्यामुळे घनकचरा विभागप्रमुख डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी यांत्रिकी विभागाला पत्र देऊन माहिती मागविली आहे. खाजगी टिप्पर्सची नोंद नसून पहाटे ५.३० ऐवजी ६.३० वा. टिप्पर कचरा संकलनासाठी जात आहेत. नारेगाव कचरा डेपोतील स्वच्छता निरीक्षकाकडे त्याची नोंद होते का, किती टिप्पर्सच्या किती फेऱ्या होतात. याची माहिती यांत्रिकी विभागाकडून मागविण्यात आली आहे. ४रोशनगेट परिसरात आयुक्त महाजन स्वच्छतेची पाहणी करीत असताना एक अजब माहिती समोर आली. दुभाजकावर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यास आयुक्तांनी विचारले, तू इथं केव्हापासून काम करतो आहेस, त्या कर्मचाऱ्याला ते आयुक्त आहेत हे माहिती नसावे. त्याने सांगितले, मी आज बायकोच्या जागी सफाई करीत आहे. मी व माझी बायको दोघेही मनपा सेवेत असल्याचेही त्याने आयुक्तांना सांगितले.आयुक्तांना हा प्रकार कळल्यानंतर ते अवाक् झाले. त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आयुक्तांनी सफाईच्या वेळेत कर्मचारी काय करतात, हे पाहण्याचा प्रयत्न केला असता कर्मचारी सफाई कामाच्या वेळेत प्रार्थनेसाठी बाहेर गेल्याची माहिती समोर आली.