शहीद अग्निवीर अक्षय गवते यांना विमानतळावर मानवंदना
By संतोष हिरेमठ | Updated: October 22, 2023 20:50 IST2023-10-22T20:50:47+5:302023-10-22T20:50:57+5:30
अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन येथे कर्तव्य बजावताना प्राण गमवावे लागले.

शहीद अग्निवीर अक्षय गवते यांना विमानतळावर मानवंदना
छत्रपती संभाजीनगर : अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते (२३, रा. बुलडाणा) यांना सियाचीन येथे कर्तव्य बजावताना प्राण गमवावे लागले. त्यांचे पार्थिव रविवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. येथे लष्कर, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींतर्फे मानवंदना देण्यात आली.
अग्निवीर अक्षय गवते यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी ६ वाजता इंडिगोच्या दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाने विमानतळावर पोहोचले. यावेळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
अक्षय गवते यांचे पार्थिव छावणी रुग्णालयाकडे रवाना झाले. सोमवारी पार्थिव सजविलेल्या लष्करी वाहनातून पिंपळगाव सराई ( जि. बुलडाणा ) या मूळ ठिकाणी जाईल, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.