गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली

By Admin | Updated: June 5, 2014 00:10 IST2014-06-04T23:44:39+5:302014-06-05T00:10:00+5:30

परभणी : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांना बुधवारी जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी आणि सामाजिक संघटनांंनी श्रद्धांजली अर्पण केली.

Tribute to Gopinathrao Munde | गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली

गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली

परभणी : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांना बुधवारी जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी आणि सामाजिक संघटनांंनी श्रद्धांजली अर्पण केली. ओबीसी सेवा मंडळ ओबीसी सेवा मंडळाची बैठक ३ जून रोजी घेण्यात येऊन त्यात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष नारायणआप्पा खंदारे, जिल्हाध्यक्ष काशिनाथ साखरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अतुल काटकर, विश्वांभर माने, सुरेश भिसे, रोहिदास नेटके, कुंडलिक उदास, रामा राऊत, बबन क्षीरसागर, सुभाष टेकुळे, भीमा भाग्यवंत, रावसाहेब जाधव, मिलन खंदारे, निखिल खंदारे, संतोष माने, दीपक साखरे, अतुल सरकाळे, प्रदीप खंदारे, अदिश खंदारे, मीनाक्षी पावटे, संगीता निर्मळ आदींची उपस्थिती होती. मराठवाड्याला ग्रहण लागले माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाले. त्यामुळे मराठवाड्यालाच ग्रहण लागल्याची भावना निर्माण होत आहे. मुंडे हे सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि ते प्रश्न सोडविण्याची धमक असणारे नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्याची अपरिमित हानी झाली, अशी प्रतिक्रिया महाराष्टÑ कॉँग्रेस कमिटीचे सचिव बाळासाहेब देशमुख यांनी दिली. धक्कादायक घटना केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि मराठवाड्याचे खंबीर नेतृत्व गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे मराठवाडा पोरका झाला. त्यांचे निघून जाणे ही सर्वात धक्कादायक घटना आहे , अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार हेमराज जैन यांनी व्यक्त केली. मुंडे यांच्या निधनाने मराठवाड्याचाच नव्हे तर महाराष्टÑाचा लढाऊ नेता गेला, त्यांच्या निधनाचे दु:ख आमच्या मनात नेहमीच सलत राहील, असे मत हेमराज जैन यांनी व्यक्त केले. खंबीर नेतृत्व पडद्याआड गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे देशातील दलित, मुस्लिम, ओबीसी समाज पोरका झाला आहे. समाजाचा आधारस्तंभ व खंबीर नेतृत्व आपल्यातून निघून गेले, अशी भावना स्व. विलासराव देशमुख एकता सेवाभावी संस्था तसेच ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. फुले कॉलनी येथील कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अध्यक्ष परवेज खुसरो, फारूख शेख, सय्यद अय्युब, विक्रम दुसाने, श्रीधर लोध, जफर शेख, राजू खरे, गोविंद आवरगंड, मारोती नागेश्वर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, अशोक सूर्यवंशी, मिर्झा अजमद बेग, प्रकाश लोंढे, अतूल सरदार, रामा वाकोडे, विठ्ठल भुसारे आदी उपस्थित होते. शारदा महाविद्यालय येथील शारदा महाविद्यालयात गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. एम. टी. मुलगीर, प्रा. डॉ. प्रशांत मेने, डॉ. एन. व्ही. सिंगापूरे, प्रा. ज्ञानोबा मुंडे, प्रा. एस. एफ. फडके, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. गोपाळ पेदापल्ली, एस. एन. जैपुरकर आदींची उपस्थिती होती. दोन दिवस दुखवटा केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शिवसैनिकांनी ३ व ४ जून असे दोन दिवस बाजारपेठ बंद ठेऊन दुखवटा पाळला. बोरीत घेतलेल्या शोकसभेत आशाताई गायकवाड, प्रकाश चौधरी, रतन बिर्ला, बिहारी राठोड, रामचंद्रराव देशमुख, कुंदन देशमुख आदी उपस्थित होते. मुंडे यांच्या निधनाने शोककळा केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची वार्ता कळताच ताडकळस येथील भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मराठवाडा विकासाचा केंद्रबिंदू असलेला नेता हरवल्याबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आले. ताडकळस बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली. क्रिकेट स्पर्धा रद्द केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे येथील स्टेडियम मैदानावर १ जूनपासून सुरू असलेली खासदार चषक स्पर्धा रद्द करण्यात आली. मंगळवारी सामना सुरू होण्यापूर्वीच गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची वार्ता आल्याने दोन्ही संघ, संयोजक अतुल सरोदे व राजे संभाजी मित्रमंडळाचे सर्व सदस्य, शिवसैनिक यांनी दोन मिनिटे शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मनपा गटनेते अतुल सरोदे यांनी स्पर्धा रद्द केल्याचे जाहीर केले. ‘लोकश्रेय’तर्फे श्रद्धांजली गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे. मराठवाडा पोरका झाला, अशी भावना लोकश्रेय मित्रमंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी व्यक्त केली. लोकश्रेयतर्फे गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. इम्तियाज खान, सागर मुंडे, कादर इनामदार यांची उपस्थिती होती. हिरा हरवला केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे राज्यातील दीन- दलित, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांचा हिरा हरवला आहे. भीमकायदा संघटनेला दु:ख झाले असून गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे रवी सोनकांबळे यांनी व्यक्त केली. असा नेता होणे नाही... गोपीनाथराव मुंडे सर्वसामान्यांचे नेते होते. कार्यकर्त्यांच्या संकटाला धावून जाणारा हा एकमेव नेता होता. गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखा नेता आता होणे नाही, अशी प्रतिक्रिया दिनेश नरवाडकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Tribute to Gopinathrao Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.