कामगार चौकात झाड दुचाकीवर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:22 IST2019-07-26T22:22:38+5:302019-07-26T22:22:45+5:30
कामगार चौकात जीर्ण झालेले बाभळीचे झाड शुक्रवारी अचानक एका दुचाकीवर कोसळले.

कामगार चौकात झाड दुचाकीवर कोसळले
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात जीर्ण झालेले बाभळीचे झाड शुक्रवारी अचानक एका दुचाकीवर कोसळले. या घटनेत दुचाकीचा चुराडा झाला आहे. सुदैवाने चालक थोडक्यात बचावला.
वाळूज एमआयडीसतील कामगार चौकालगत मुख्य रस्त्यावर बाभळीचे जुणे मोठे झाड असून, ते जीर्ण झाले आहे. या झाडाखाली अनेकांनी अतिक्रमण करुन व्यवसाय थाटले आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ताहेर बेग हा दुचाकीवरुन (एमएच- २०, सीबी- ८०९६) नाष्टा करण्यासाठी कामागार चौकात गेला होता.
बाभळीच्या झाडाखाली दुचाकील लावून एका हातगाड्यावर नाष्टा करत होता. नाष्टा करुन दुचाकीकडे परत येत असताना अचानक बाभळीचे जीर्ण झाड उन्मळून दुचाकीवर पडले. यात दुचाकीचा चुराडा झाला असून दुचाकीस्वार बेग हा बालंबाल बचावला.