‘स्वाईन’ संशयित पाच जणांवर उपचार
By Admin | Updated: March 31, 2015 00:37 IST2015-03-31T00:11:55+5:302015-03-31T00:37:09+5:30
उस्मानाबाद : येथील जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्लू संशयित म्हणून उपचारासाठी दाखल असलेल्या दोन महिलांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़

‘स्वाईन’ संशयित पाच जणांवर उपचार
उस्मानाबाद : येथील जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्लू संशयित म्हणून उपचारासाठी दाखल असलेल्या दोन महिलांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ मात्र, ते स्वॅब ‘बी’ वर्गातील असल्याचे सांगत प्रयोगशाळेकडून रिजेक्ट करण्यात आले आहेत़ सद्यस्थितीत पाच जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़
उन्हाचा पारा ३८ अंशावर गेला असला तरी अद्यापही जिल्ह्यात स्वाईन फ्लू संशयित रूग्ण आढळून येत आहेत़ तर शिंगोली येथील संगिता रामराव राठोड (वय२९) या महिलेचा सोलापूर येथील खासगी रूग्णालयात रविवारी दुपारी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे़ मागील दोन दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन महिलांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते़ मात्र, हे दोन्ही स्वॅब ‘ब’ वर्गातील असल्याचे सांगत प्रयोगशाळेकडून हे रिजेक्ट करण्यात आले आहेत़ सद्यस्थितीत पाच संशयित रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत़ यामध्ये अनसुर्डा येथील एक ६० वर्षीय इसम, उस्मानाबाद शहरातील सांजा चौक परिसरातील एक ३१ वर्षीय इसम, उकडगाव (ता़बार्शी) येथील एक ५४ वर्षीय महिला, सोनेगाव येथील एक ४५ वर्षीय महिला व उस्मानाबाद शहरातीलच एका इसमावर उपचार सुरू आहेत़ पाचही संशित रूग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़