हस्तमुद्रेद्वारे करा रोगांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST2021-03-09T04:06:12+5:302021-03-09T04:06:12+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जैन टॅग ग्रुपतर्फे मिरॅकल्स ऑफ हस्तमुद्रा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ७ ...

हस्तमुद्रेद्वारे करा रोगांवर उपचार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जैन टॅग ग्रुपतर्फे मिरॅकल्स ऑफ हस्तमुद्रा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ७ मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात मुंबई येथील डॉ. सुजाता यांनी हस्तमुद्रेविषयी महिलांना मार्गदर्शन केले.
डॉ. सुजाता जैन या न्युमरोलॉजिस्ट, मुद्रातज्ज्ञ, बाल मानसोपचारतज्ज्ञ तसेच विवाह समुपदेशक आहेत. वेगवेगळ्या हस्तमुद्रांद्वारे व तत्त्वांद्वारे विविध रोगांवर कसे उपचार करता येतात, हे त्यांनी प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले. पृथ्वी, जल, सूर्य, आकाश, वायू मुद्रा व तत्त्वांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. यशिका पांडे यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. दीपिका बडजाते, सपना पाटणी, उज्ज्वला पाटणी, मिताली काला यांनी प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले. अनिल जैन, वैशाली जैन यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. संस्थापक अध्यक्षा अनुपमा दगडा, कोषाध्यक्षा दीपाली पांडे, उपाध्यक्षा मोनिका चांदीवाल, सेक्रेटरी स्वाती कासलीवाल यांनी अतिथींचे स्वागत केले. ब्रम्हचारिणी मंजू दीदी (चाणक्यपुरी) तसेच त्यांचा संघ या कार्यक्रमास उपस्थित होता. तसेच समाजाचे अध्यक्ष ललित पाटणी, महावीर ठोले, वर्धमान पांडे, नितीन गंगवाल यांच्यासह इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती.
फोटो ओळ :
जैन टॅग ग्रुप आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. सुजाता जैन.