प्रवासी महिलेचे गंठण लंपास

By Admin | Updated: May 19, 2017 00:18 IST2017-05-19T00:15:54+5:302017-05-19T00:18:44+5:30

तुळजापूर : खासगी जीपमध्ये बसलेल्या महिला भाविकाच्या गळ्यातील २ तोळे १७ ग्रॅमचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले़

Traveling woman's lump lamps | प्रवासी महिलेचे गंठण लंपास

प्रवासी महिलेचे गंठण लंपास


लोकमत न्यूज नेटवर्क
तुळजापूर : खासगी जीपमध्ये बसलेल्या महिला भाविकाच्या गळ्यातील २ तोळे १७ ग्रॅमचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना बुधवारी रात्री घडली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील शिराढोण येथील अनुराधा बालाजी पानकुरे ही महिला नातेवाईकासमवेत बुधवारी रात्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आली होती़ रात्री मंदीर बंद झाल्याने उस्मानाबाद मार्गावरील मलबा हॉस्पिटलसमोर त्यांची जीप थांबली होती़ जीपमधील अनुराधा पानकुरे या जीपच्या खिडकीमध्ये बसल्या होत्या़ रात्रीच्यावेळी चोरट्यांनी खिडकीतून हात घालून त्यांच्या गळ्यातील २ तोळे १७ ग्रॅमचे ३८ हजार रूपयांचे गंठण हिसकावून पळ काढला़ याबाबत अनुराधा पानकुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भाविकांसह शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़
 

Web Title: Traveling woman's lump lamps