शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

अरेरे! उलटलेल्या पिकअपमधील गोळ्या, बिस्कीट, सोनपापडी लुटण्यासाठी वाटसरूंची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 20:03 IST

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना; ट्रकचालक जखमी

आडूळ (छत्रपती संभाजीनगर) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे शिवारात टायरचे पंक्चर काढण्यासाठी उभ्या केलेल्या पिकअपला ट्रकने पाठीमागून धडक दिली. या अपघातात पिकअप उलटल्यानंतर त्यामधील गोळ्या, बिस्कीट अन् सोनपापडी लुटण्यासाठी वाटसरूंची झुंबड उडाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारात शनिवारी दुपारी ३ वाजेच्या छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाणाऱ्या पिकअप वाहनाचे (एम एच २०,ई जी १०३७ ) टायर पंक्चर झाले. त्यामुळे वाहन रस्त्यावरच उभे करून चालक पंक्चर काढण्यासाठी टायर घेऊन बाजूच्या दुकानात गेला होता. नेमके त्याच वेळेस पाठीमागून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने (एच आर ३७,ई १७४६ ) उभ्या पिकअपला जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला तर पिकअप वाहन रस्त्यावरच उलटले. यावेळी अपघातग्रस्त पिकअपमधील बिस्किटे, चाॅकलेट, गोळ्या, गुलाबजामुन, सोनपापडी, म्हैसूर पाक आदी वस्तूंच्या बरण्या व इतर साहित्य रस्त्यावर विखुरले गेले होते. त्यामुळे उपस्थित वाटसरू व ग्रामस्थांनी जखमीला मदत करण्याऐवजी हे साहित्य लुटण्यात धन्यता मानली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांची गर्दी वाढली. काही वाहनधारकांनी वाहन थांबवून हे साहित्य उचलून नेले.

पोलिसांना पाहून ग्रामस्थ पसारया घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना पाहून उपस्थित ग्रामस्थ पसार झाले. या अपघातात पिकअपमधील किती साहित्य पळवले गेले हे पोलिस तपासात निष्पन्न होईल. मात्र याप्रकरणी ट्रक मालक आला नसल्याने अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. ट्रक मालकाच्या तक्रारीनंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात