‘आवडेल तिथे प्रवास’ महागला

By Admin | Updated: June 9, 2014 01:12 IST2014-06-09T00:36:34+5:302014-06-09T01:12:59+5:30

हिंगोली : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या दरात जूनपासून वाढ झाली.

'Travel wherever you like' expensive | ‘आवडेल तिथे प्रवास’ महागला

‘आवडेल तिथे प्रवास’ महागला

हिंगोली : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या दरात जूनपासून वाढ झाली. मागील दरांपेक्षा आता जवळपास १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने आवडीच्या ठिकाणाचा प्रवास प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत आहे. परिणामी पर्यटन किवा देवस्थानची परिक्रमादेखील आता महागात पडणार आहे.
कायम तोट्यात असल्याचा शिक्का राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. याची तथ्यता कितपत आहे, याबद्दल साशकंता वाटते; परंतु तोट्याच्या नावाखाली परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरांत वाढ केली जाते. अलीकडच्या तीन वर्षांत जवळपास दुप्पटीने सर्वच भाड्यांत वाढ झाली. नियमित अंतराने ही वाढ सुरूच असताना पुन्हा प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली. आता ‘आवडेल तिथे प्रवास’ प्रत्येकाला चांगलाच महागात पडणार आहे. आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्धापन दिन साजरा करताना हळूच राज्य परिवहन महामंडळाने दरात वाढ केली. परिणामी ४ दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात; पण कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसांसाठी प्रौढांसाठी ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात. प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटांत केली असून १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकीटांचे वाढीव दर राहणार आहेत. उलट कमी गर्दीच्या १५ जूनपासून ते १४ आॅक्टोबरपर्यंत तिकीटांत थोडासा दिलासा मिळाला. दुसरीकडे ७ दिवसांच्या प्रवासासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून प्रवास करता येणार आहे. निमआराम बससाठी प्रौढांना १ हजार ६०५ तर मुलांसाठी ८०५ रूपये ७ दिवसांच्या प्रवासासाठी भरावे लागतात. सात दिवसांच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी १ हजार ७३० तर मुलांसाठी ८६५ रूपये भरून प्रवास करता येणार आहे. गर्दीच्या कालावधीसाठी या तिकीटांच्या दरांपेक्षा कमी गर्दीच्या हंगामात आगाराने थोडासा दिलासा दिला. आगाराचे दर वाढत जात असल्याने प्रवासांच्या खिशाला चाट पडत आहे. इतर वाहतूकीच्या तुलनेत एसटीचे भाढे वाढत राहिल्याने प्रवाशांना बसचा प्रवास डोईजड होतना दिसतो. महामंडळाच्या वाढीव दराचा फायदा हिंगोली आगारास होण्याची शक्यता आहे. इतर वाहतूक नसल्यामुळे प्रवाशांना बसशिवाय पर्याय नसल्यामुळे उत्पन्न वाढीची आशा आहे. (प्रतिनिधी)
कायम तोट्याच्या नावाखाली राज्य परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरांत वाढ केली जाते असताना अलीकडच्या तीन वर्षांत जवळपास दुप्पटीने सर्वच भाड्यांत झाली वाढ.
आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्र्धापन दिन साजरा करताना हळूच परिवहन महांडळाने केली दरात वाढ.
प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटात केली असून १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकीटांचे वाढीव दर राहणार आहेत.
उलट कमी गर्दीच्या १५ जुनपासून ते १४ आॅक्टोबरपर्यंत तिकीटांत थोडासा दिलासा मिळाला.
आता चार दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात; परंतु कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसाच्या प्रवासासाठी प्रौढांना ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात.
सात दिवसांच्या प्रवासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून करता येणार प्रवास.

Web Title: 'Travel wherever you like' expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.