शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

प्रवास कर्तव्यदक्षतेचा! केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराडांकडून विमान प्रवासात प्रवाशावर आपत्कालीन उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 12:38 PM

Union Minister Dr. Bhagvat Karad: भाजप खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री असलेले भागवत कराड हे मराठवाड्यात सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून देखील परिचित आहेत.

औरंगाबाद : मूळ डॉक्टर असलेले केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat Karad ) पुन्हा एकदा गरजवतांच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी विमान प्रवासादरम्यान मागील सीटवरील प्रवासी अचानक कोसळून पडल्याचे समजतातच डॉ. कराड यांनी तत्काळ प्रथमोपचार करत त्याला दिलासा दिला. डॉ. कराड यांच्या समयसूचकता आणि सेवाभावाचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे. 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' ही संतांची शिकवण कायम लक्षात ठेवून मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉ. कराड यांनी या घटनेबद्दल सोशल मिडीयावर माहिती देताना केले.

भाजप खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री असलेले भागवत कराड हे मराठवाड्यात सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून देखील परिचित आहेत. रुग्णांच्या सेवाकार्यादरम्यानच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. नगरसेवक ते खासदार आणि आता केंद्रीय राज्यमंत्री असताना देखील त्यांनी रुग्णसेवेचे व्रत पाळलेले दिसते. काही दिवसांपूर्वी शहरातील सुभेदारी विश्रामगृहासमोर अपघात झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ धाव घेत जखमींवर उपचार केले होते. असाच प्रसंग सोमवारी विमान प्रवासादरम्यान देखील पाहायला आला. डॉ. कराड हे इंडिगो विमानातून प्रवास करता असताना मागील सीटवरील प्रवासी कोसळून पडला. याची माहिती मिळताच डॉ. कराड यांनी तत्काळ त्या प्रवाशावर उपचार केले. डॉ. कराड यांच्या समयसूचकतेने आणि सेवाभावामुळे योग्य उपचार मिळून त्या प्रवाशाचे प्राण वाचले. यानंतर सोशल मीडियात केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी याबद्दल पोस्ट शेअर करत भारतीय संस्कृतीच्या शिकवणीप्रमाणे कयाम मदतीसती पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. 

केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांची पोस्ट, ''काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइटमध्ये 12 A सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड सुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. " एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ "  संतांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या.''

हेही वाचा : अपघात दिसताच ताफा थांबवला; केंद्रीय मंत्री भागवत कराडांमधील ‘डॉक्टर’ उपचारासाठी तत्काळ धावला !

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर