छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग असलेल्या छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्यात आहे. त्याशिवाय बिडकीन येथे रस्त्याचे काम सुरू असून, बिडकीनमधील निलजगाव फाटा या ठिकाणी सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
या प्रमुख कामांमुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता लक्षात घेता बिडकीन डीएमआयसीकडून निलजगाव फाटा मार्गे बिडकीनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक वळवण्यात येणार आहे. ४ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबरपर्यंत हा आदेश लागू असेल, असे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी शुक्रवारी नमूद केले.
असा असेल वाहनांचा मार्ग-कचनेर, निलजगाव-बिडकीन डीएमआयसी, इंडुरन्स कंपनी जवळून, शेकटा फाटा, बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे वाहने जातील.-छत्रपती संभाजीनगर, निलजगाव फाटा बिडकीन, शेकटा फाटा- इंडुरन्स कंपनीजवळुन बिडकीन डीएमआयसी, निलजगाव मार्गे कचनेरकडे जातील.-वाळुज, शेंदूरवादा, शेकटा फाटा इंडुरन्स कंपनीजवळून, बिडकीन डीएमआयसी -निलजगाव मार्गे कचनेरकडे जातील.-कचनेर, निलजगाव, बिडकीन डीएमआयसी, इंडुरन्स कंपनीजवळून शेकटा फाटा, शेंदूरवादा मार्गे वाळुजकडे जातील.
Web Summary : The Chhatrapati Sambhajinagar-Paithan road is closed for widening from October 4th to 18th due to construction near Bidkin. Traffic will be diverted via Kachner, Nilajgaon, and Shekata Phata. Motorists are advised to use alternate routes during this period to avoid congestion.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर-पैठण मार्ग 4 से 18 अक्टूबर तक चौड़ीकरण के लिए बंद है। बिडकिन के पास निर्माण के कारण यातायात कचनेर, निलजगांव और शेकता फाटा से परिवर्तित किया जाएगा। चालकों को सलाह दी जाती है कि वे इस अवधि के दौरान भीड़ से बचने के लिए वैकल्पिक मार्गों का उपयोग करें।