आठवडाअखेरपर्यंत उडणार बदल्यांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:33 AM2017-08-09T00:33:21+5:302017-08-09T00:33:21+5:30

या आठवड्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा बार फुटेल, अशी खात्रीलायक माहिती आहे.

 The transit bar that flies by the end of the week | आठवडाअखेरपर्यंत उडणार बदल्यांचा बार

आठवडाअखेरपर्यंत उडणार बदल्यांचा बार

googlenewsNext

विजय सरवदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये जिल्ह्यांतर्गत बदल्यांची आतुरता शिगेला पोहोचली आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा बार फुटेल, अशी खात्रीलायक माहिती असून उद्या बुधवारी ग्रामविकास सचिवांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधणार आहेत. त्यावेळी जिल्ह्यांतर्गत बदल्यासंबंधी सूचना मिळण्याची अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली आहे.
बदल्यांसाठी जि.प.चा शिक्षण विभाग सज्ज असून, पहिल्या टप्प्यात १२५७ शिक्षक बदलीसाठी रांगेत आहेत. तथापि, अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकांना बदलीसाठी आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील मराठी माध्यमाचे ४९५ मुख्याध्यापक, १३९० पदवीधर शिक्षक, २ हजार ७९८ सहशिक्षक आणि उर्दू माध्यमाच्या २०७ शिक्षकांनी अशा एकूण ४ हजार ८९० शिक्षकांनी आॅनलाइन नोंदणी केलेली होती.
शिक्षण विभागाने या सर्व शिक्षकांची आॅनलाइन मॅपिंग पूर्ण केली आहे. त्यानंतर बदलीच्या नवीन धोरणानुसार ग्रामविकास विभागाने संवर्ग- एक आणि संवर्ग- दोन यामध्ये नमूद प्रवर्गाच्या शिक्षकांकडूनही आॅनलाइन नोंदणी करून घेतली होती. यामध्ये संवर्ग- एकमध्ये (कंसातील आकडेवारी संवर्ग- दोनची वाचावी) औरंगाबाद तालुक्यात १७४ (८५), फुलंब्री तालुक्यात ६१ (६६), गंगापूर तालुक्यात १०५ (६६), कन्नड तालुक्यात १२५ (६५), वैजापूर तालुक्यात ८२ (४२), खुलताबाद तालुक्यात ४३ (३५), पैठण तालुक्यात ९८ (६२), सोयगाव तालुक्यात ४२ (०२) आणि सिल्लोड तालुक्यात ७५ (६६) असे एकूण संवर्ग- एकमध्ये ७६३ आणि संवर्ग- दोनमध्ये ४९४ अशा एकूण १२५७ शिक्षकांनी बदलीसाठी मागणी नोंदवलेली
आहे.
औरंगाबाद जि.प. शिक्षकांच्या बदलीसाठी सज्ज असल्यामुळे पहिल्या टप्प्यात या जिल्ह्याचा क्रमांक लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. उद्या ग्रामविकास सचिवांसोबत यासंबंधीची चर्चा होईल. त्यानंतर लगेच पुढील सूचनेनुसार बदल्यांची प्रक्रिया राबवली जाईल.

Web Title:  The transit bar that flies by the end of the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.