बदल्या १७ ते २३ मेदरम्यान होणार

By Admin | Updated: May 8, 2014 00:38 IST2014-05-08T00:37:58+5:302014-05-08T00:38:30+5:30

कळमनुरी : शिक्षकांच्या सर्वसाधरण जिल्हास्तरीय बदल्या १७ ते २३ मे दरम्यान तर तालुकास्तरावरील बदल्या २६ ते ३१ मे दरम्यान समुपदेशनाद्वारे होणार आहेत.

The transfers will take place from May 17 to 23 | बदल्या १७ ते २३ मेदरम्यान होणार

बदल्या १७ ते २३ मेदरम्यान होणार

कळमनुरी : शिक्षकांच्या सर्वसाधरण बदल्यांचे नवीन परिपत्रक आले असून या परिपत्रकानुसार जिल्हास्तरीय शिक्षकांच्या बदल्या १७ ते २३ मे दरम्यान तर तालुकास्तरावरील बदल्या २६ ते ३१ मे दरम्यान समुपदेशनाद्वारे होणार आहेत. जिल्हास्तरीय बदल्यांच्या प्रक्रियेपुर्वी लोकसभा निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहिता व त्या करीता नेमणूक केलेल्या कर्मचारी या बाबी विचारात घेता बदल्यांची प्रकिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी या वर्षापुरता बदल्यांच्या वेळापत्रकात शासनाने बदल केला आहे. मागील वर्षीच्या परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या गट ‘क’व गट ‘ड’ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे परिपत्रकात नमुद आहे. याबाबत ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुडवे यांच्या स्वाक्षरीने ३ मे रोजी बदल्या बाबत शासनाने परिपत्रक काढले आहे. शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के प्रशासकीय, १० टक्के, विनंती बदल्या केल्या जाणार आहेत. या बाबत शिक्षणाधिकारी पाईकराव यांना विचारले असता या सुधारित वेळापत्रकाप्रमाणेच बदल्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The transfers will take place from May 17 to 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.