शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षण पत्राअगोदरच नोटीस !

By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST

हरी मोकाशे , लातूर विधानसभा निवडणुकीचे कामकाज व्यवस्थित पार पडावे म्हणून जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रविवारी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

हरी मोकाशे , लातूरविधानसभा निवडणुकीचे कामकाज व्यवस्थित पार पडावे म्हणून जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रविवारी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास ७ हजार १२८ पैकी ४२३ जण गैरहजर राहिले. या प्रशिक्षणासंदर्भात अनुपस्थित राहणाऱ्यांपैकी काहींना पत्रच मिळाले नसल्याचे पहावयास मिळत आहे. हे पत्र मिळण्याअगोदरच कारणे दाखवा नोटीस त्यांच्या हाती पडली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी अधिसूचना जारी झाली. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ असून, त्यातील लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर आणि औसा या चार मतदारसंघांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रविवारी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऐनवेळी कुठलीही अडचण येऊ नये म्हणून मतदानावेळी घ्यावयाची काळजी तसेच मतदान यंत्र हाताळण्याची माहिती याची इत्यंभूत माहिती या पहिल्या प्रशिक्षणात देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी लातूर शहर मतदारसंघातील २१०७, अहमदपुरातील १७७८, औशातील १६४३ आणि उदगीर मतदारसंघातील १६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठीची पत्रे दोन दिवसांपूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संबंधित कार्यालयास पाठविण्यात आली होती. परंतु, ७१२८ पैकी ४२३ जण गैरहजर राहिले. गैरहजर राहणाऱ्यांमध्ये लातूर शहर मतदारसंघातील २०५, अहमदपुरातील २४, औशातील १५४, उदगीरमधील ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्यांना तात्काळ नोटिसाही बजावण्यात येऊन खुलासे मागविण्यात आले आहेत. परंतु, प्रशिक्षणासंदर्भातील पत्रे अनुपस्थित राहणाऱ्यांपैकी काहींना मिळालीच नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठीचे पत्र नाही, परंतु नोटीस मात्र बजावली जात आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. निवडणूक विभागाने प्रशिक्षणाचे पत्र देण्याअगोदरच नोटीस बजावल्याने यात दोष कोणाचा, असा सवालही व्यक्त होत आहे. अनुपस्थित राहिलेल्यांपैकी २२५ जणांनी अद्यापही खुलासे सादर केले नाहीत. विशेष म्हणजे औसा मतदारसंघातील एकाही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने गांभीर्याने नोटिशीची दखल घेतली नाही. तसेच लातूर शहर मतदारसंघातील ५२, उदगीरमधील १९ जणांनी नोटिशीचे उत्तर दिले नाही. प्रशिक्षणासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संबंधित कार्यालयास पत्रे पाठविण्यात आली होती. त्या कार्यालय प्रमुखाकडून पोहोचही घेण्यात आली होती, असे लातूर शहर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश शेवाळे, औशाचे डी.एन. भारस्कर, विजय अवधाने यांनी सांगितले.वास्तविक पाहता उदगीर मतदारसंघासाठीच्या प्रशिक्षणासाठी १५१ जण गैरहजर असले तरी त्यातील १११ जणांपैकी काहींची नावे डबल तर काहीजण दीर्घ रजेवर असल्याचे आढळून आले आहे. दीर्घ रजेवर, आजारी असणाऱ्यांच्या नावेही पत्र काढण्यात आले होते.