मेडिकल सीईटीसाठी ५५० कर्मचार्यांना प्रशिक्षण
By Admin | Updated: May 3, 2014 14:47 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:47:35+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी २०१४, ८ मे रोजी होणार आहे. ही परीक्षा औरंगाबादेतील ६,९९४ विद्यार्थी विविध १८ केंद्रांवर देतील. त्यासाठी बुधवारी ५५० अधिकारी व कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

मेडिकल सीईटीसाठी ५५० कर्मचार्यांना प्रशिक्षण
८ मे रोजी ६,९९४ देणार सीईटी
औरंगाबाद : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी २०१४, ८ मे रोजी होणार आहे. ही परीक्षा औरंगाबादेतील ६,९९४ विद्यार्थी विविध १८ केंद्रांवर देतील. त्यासाठी बुधवारी ५५० अधिकारी व कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असून घाटीचे अधिष्ठाता डॉ. के.एस. भोपळे, डॉ. अजित दामले हे विभागीय अधिकारी आहेत. डॉ. मिर्झा सिराज बेग औरंगाबाद जिल्ह्याचे संपर्क अधिकारी आहेत.
परीक्षेसाठी जिल्हाधिकार्यांनी उपकें द्रप्रमुख, समन्वय अधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी अशा ५५० जणांची सेवा अधिग्रहित केली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळता सर्व अधिकारी, कर्मचार्यांना बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या महात्मा गांधी सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. बेग यांनी त्यांना कर्तव्ये व जबाबदारीची माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, डॉ. भास्कर खैरे, डॉ. अजित दामले, सुधीर जहागीरदार, संजय मगर, के.सी. मुंढे, सी.एन. कुं टे, महेश गावडे, राजेश एम. जामगे, सोमनाथ माठे, अशोक शिंदे आदींनी प्रयत्न केले.