२० हून अधिक वेळा तोडले वाहतूक नियम; दंड चुकवण्यासाठी बदलली नंबर प्लेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 07:54 PM2020-07-30T19:54:26+5:302020-07-30T19:56:14+5:30

आरोपींनी त्यांच्या दुचाकी नंबर प्लेटवर खोटा क्रमांक असल्याचे सांगितले.

Traffic rules broken more than 20 times; Changed number plate to avoid fines | २० हून अधिक वेळा तोडले वाहतूक नियम; दंड चुकवण्यासाठी बदलली नंबर प्लेट 

२० हून अधिक वेळा तोडले वाहतूक नियम; दंड चुकवण्यासाठी बदलली नंबर प्लेट 

googlenewsNext
ठळक मुद्देफसवणूक करणाऱ्या दोघांंना पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद :  वाहतूक नियम वीसहून अधिक वेळा तोडल्याने दंड  भरण्याचे टाळण्यासाठी चक्क दुचाकीची नंबर प्लेट बदलून फसवणूक करणाऱ्या दोघांंना पोलिसांनी अटक केली.

सूरज काशीनाथ  चव्हाण आणि विलास प्रभू चव्हाण, अशी आरोपींची नावे आहेत. वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक मनोज बहुरे हे मंगळवारी पैठणगेट येथे वाहतूक नियमन करीत होते. यावेळी त्यांना एमएच २३ एएल ४९६९ या क्रमांकाची  नोंदणी असलेल्या दुचाकीने सूरज चव्हाण हा  जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्याकडे लायसन्स आणि दुचाकीच्या मालकीहक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. तेव्हा त्याने दुचाकी मालकाला बोलावून घेतले. 

यावेळी आरोपींनी त्यांच्या दुचाकी नंबर प्लेटवर खोटा क्रमांक असल्याचे सांगितले. त्यांच्या दुचाकीचा खरा क्रमांक एमएच २३ एक्यू ८५१७ असल्याचे सांगितले.  दंड भरावा लागू नये म्हणून नंबर प्लेट बदलल्याची कबुली दिली. सपोनि बहुरे यांनी  गुन्हा नोंदविला. 

Web Title: Traffic rules broken more than 20 times; Changed number plate to avoid fines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.