‘तो’ वाहतूक पोलिस अखेर निलंबित

By Admin | Updated: November 17, 2015 00:28 IST2015-11-16T23:55:41+5:302015-11-17T00:28:52+5:30

\जालना : सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत धिंगाना घालणाऱ्या वाहतूक पोलिस संजय घोरपडे याला पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी सोमवारी निलंबित केले आहे.

The traffic police 'finally' suspended | ‘तो’ वाहतूक पोलिस अखेर निलंबित

‘तो’ वाहतूक पोलिस अखेर निलंबित


\जालना : सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत धिंगाना घालणाऱ्या वाहतूक पोलिस संजय घोरपडे याला पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी सोमवारी निलंबित केले आहे. तसेच त्यांची खात्यातंर्गत चौकशी सुरू केले आहे.
याबाबत रविवारी लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्याची प्रभारी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी गंभीर दखल घेतली.
जिल्हा वाहतूक शाखेतील पो. कॉ. संजय घोरपडे याने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सरोजनीदेवी रस्त्यावरील वाहनांना पाडले. त्यानंतर परिसरातील एका पेट्रोलपंपावर दगडफेक करून तोडफोड केली. याबाबत सदर बाजार पोलिसांना माहिती मिळताच पाच मिनिटांत गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी येऊन मद्यधुंद असलेल्या घोरपडे यास पोलिस गाडीत बसवून ठाण्यात नेले. मात्र, त्याच्याविरूद्ध काहीही कारवाई न करता तेथून त्याला घरी पाठविले होते.
याबाबत रविवारी लोकमतमध्ये त्या कर्मचाऱ्याने घातलेल्या धिंगान्याचे छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन त्या कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित करून खात्यातर्गत चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी शिस्तीत राहावे, शिस्तभंग केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक माकणीकर यांनी लोकमतशी बोलताना दिला .

Web Title: The traffic police 'finally' suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.