केळणा नदीला पूर आल्याने पिंपळगाव घाट येथे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:27+5:302021-06-09T04:06:27+5:30

केळगाव परिसरात सायंकाळी पाच वाजेदरम्यान अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दमदार पाऊस पडल्याने मंगळवारपासून पेरणीला सुरुवात होणार आहे. पाऊस ...

Traffic jam at Pimpalgaon Ghat due to flooding of Kelana river | केळणा नदीला पूर आल्याने पिंपळगाव घाट येथे वाहतूक ठप्प

केळणा नदीला पूर आल्याने पिंपळगाव घाट येथे वाहतूक ठप्प

केळगाव परिसरात सायंकाळी पाच वाजेदरम्यान अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दमदार पाऊस पडल्याने मंगळवारपासून पेरणीला सुरुवात होणार आहे. पाऊस पडल्याने केळणा नदीला हंगामातील पहिला पूर आला होता. या पुरामुळे भराडीला जाणारा पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहनधारकांना ताटकळत बसावे लागले. केळगाव ते अंभई रस्त्यावर पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या पावसामुळे मात्र केळगाव धरणात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अंभईसह पाच गावांचा पाणी प्रश्न तूर्तास मिटला आहे. यावर्षीचा परिसरातील केळणा नदीला पहिलाच पूर आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

फोटो : केळणा नदीला आलेला पूर

फोटो कॅप्शन

सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे केळणा नदीला हंगामातील पहिला मोठा पूर आला. यात केळगाव ते अंभई रस्त्यावर पिंपळगाव घाट येथील पुलावरुन असे पाणी वाहत असल्याने सुमारे दोन तास वाहतुक ठप्प झाली होती.

070621\img-20210607-wa0247_1.jpg

केळणा नदीला पूर आल्याने पिंपळगाव घाट येथे केळगाव ते अंभई रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: Traffic jam at Pimpalgaon Ghat due to flooding of Kelana river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.