शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

वाहतुकीचा खेळखंडोबा; व्यापारी फुटपाथवर, ग्राहकांची वाहने रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 2:42 PM

या अनुदानातून तीन वर्षांपूर्वी महापालिकेने चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्दे २४ मीटर रुंद रस्त्याची दुर्दशापोलीस व महानगरपालिकेचेही दुर्लक्ष

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अनुदानातून महापालिकेने सिडको एन -६ चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत ३ कोटी ५२ लाख रुपये खर्च करून रस्ता तयार केला.  या रस्त्यावर नागरिकांना पायी चालण्यासाठीसुद्धा जागा भेटत नाही हे विशेष. फुटपाथ व्यापाऱ्यांनी गायब केले. व्यापाऱ्यांच्या ग्राहकांची वाहने आता रस्त्यावर राजरोसपणे लागत आहेत. या सर्व परिस्थितीकडे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस डोळेझाक करीत आहेत. 

शहरातील रस्ते दर्जेदार आणि सिमेंटकाँक्रीटचे तयार व्हावेत म्हणून मागील सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाने महापालिकेला तब्बल २७६ कोटी रुपये दिले. या अनुदानातून तीन वर्षांपूर्वी महापालिकेने चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. २४ मीटर रुंद रस्त्यावर महापालिकेने १५ मीटरपर्यंत दोन्ही बाजूने सिमेंट रस्ता तयार केला. ७.५ मीटर एका बाजूने काम करण्यात आले. चिश्तिया चौकापासून थेट बजरंग चौकापर्यंत रस्त्याचा वापर कुठे ८ फूट तर कुठे ६ फूट एवढाच होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहने सिमेंट रस्त्यावर उभी असतात.  पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. 

नागरिकांच्या हक्काचे फुटपाथ गायब महापालिकेने १५ मीटर रुंद सिमेंट रस्ता केला. दोन्ही बाजूने चार-चार मीटर जागा फुटपाथसाठी सोडण्यात आली. ही जागा आता महापालिकेच्या नकाशावरच दिसते. या भागातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. 

साडेतीन कोटी रुपये खर्च तरी कशाला केले? चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत रस्त्याचा वापर एक वाहन जाईल एवढाच होतो आहे. महापालिकेने तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करून गुळगुळीत सिमेंट रस्ता तरी कशासाठी केला असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत रस्ता : - खर्च  ३ कोटी ५२ लाख- रस्त्याची लांबी  १ किलोमीटर- रस्त्याची रुंदी  ७.५ मीटर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा