कुंभारवाड्यातील पारंपरिक पणत्यांना आधुनिकतेचा साज
By Admin | Updated: October 14, 2014 00:34 IST2014-10-13T22:43:25+5:302014-10-14T00:34:37+5:30
विनोद नरसाळे ल्ल कोळगाव अनेक वर्षांपासून पारंपारीक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या पणत्यांना यंदा आधुनिकतेचा साज देण्यात आला असल्याने

कुंभारवाड्यातील पारंपरिक पणत्यांना आधुनिकतेचा साज
विनोद नरसाळे ल्ल कोळगाव
अनेक वर्षांपासून पारंपारीक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या पणत्यांना यंदा आधुनिकतेचा साज देण्यात आला असल्याने या पणत्या सर्वांच्या आर्कषणाचा विषय ठरतो आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी भाव वाढले असल्याने पणत्यावरही महागाईचा काळोख परसला आहे.
दिवाळी म्हटल की, प्रकाशाचा सण, दिव्यांचा उत्सव. गावा-गावातील कुंभार वाड्यात पणत्या बनविण्यास वेग आला आहे. बाजारामध्ये दर वर्षी वेगवेगळ्या पद्धतीच्या पणत्या विक्रीस येत असल्याने पारंपारीक पणत्यांची मागणी घटली होती मात्र जमान्या सोबत चलायचे असेल तर बदल आवश्यक असल्याची बाब लक्षात आल्याने पणत्यांचा पारंपारीक साज बदल्यास यंदा प्राधान्य दिले गेले आहे. पणत्यांना विविध रंगानी रंगविले जात असल्याने बाजारात या पणत्या सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहेत.
लाल मातीपासून बनविलेल्या या पणत्यांना परदेशी पणत्यांप्रमाणे रंग देण्यात येत आहे. फायबर, प्लास्टिक, इलेक्ट्रानिक, चायनीज प्रकारच्या पणत्यांच्या तुलनेत बनविण्चा प्रयत्न केला जात आहे. पुर्वी मातीच्या पणत्यांचा वापर केला जायचा मात्र अलीकडच्या काळात चायनिज पणत्यांची चलती आहे. त्यामुळे पारंपारीक पद्धतीच्या पणत्यांना नव्याने बाजारात उतरविले जात आहे.
हिंदु परंपरेनसार संस्कृतीची जपवणूक करुनच प्रत्येक सण साजरे केला जातात. आधुनिक काळात सर्वच स्तरावर बदल होत चालले आहेत त्यामुळे नियमीत वापरांच्या वस्तु व मागणीत बदल होत चालले असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी बाजारपेठेत जवळपास चायनिज वस्तुंचा शिरकाव झाला आहे. विशेष म्हणजे, त्या वस्तु स्वस्त असल्याने त्यास प्राधान्य दिले जाते. परिणामी पारंपारीक वस्तु विक्रीवर परिणाम होत चालला आहे. त्याला उत्तर म्हणून पारंपारीक वस्तु आता आकर्षक स्वरुपात ग्रामीण भागात तयार करुन त्याच ठिकाणी विक्री करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे समोर आले आहे.
यंदाच्या दिवाळीत राजस्थानी व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या कला-कुसरीच्या पणत्या बाजारात आणल्या आहेत. राजस्थानी हॅन्डवर्क, कुंदनाच्या पणत्या, चिमनिच्या पणत्या अशा विविध प्रकारच्या पणत्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पणत्यांची किंमतही १० ते १०० रुपयांचा दरम्यान आहेत. लाल मातिच्या पणत्यांची किंमत ३० ते ४० रुपयांच्या दरम्यान आहे. स्थानिक कुंभारवाड्यात अशा पणत्या बनविण्याचे काम जोरात सुरु आहे. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी पणत्यांच्या किमती वाढली आहे.
या संदर्भात बोलताा पणती व्यावसायीक बाबासाहेब आहेरकर म्हणाले, आधुनिक काळात ग्रामीण भागात मातीच्या साध्या पणत्यात महत्व राहिले नाही.
नक्षबाज कला कुसरीने साज असणाऱ्या पणत्याकडे लोकांची ओढ निर्माण झाल्याने पारंपारिक पणत्या तयार करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढण्याची शक्यता आहे.