१७ वर्षांपासून ट्रॅक्टरपोळ्याची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:11 IST2017-08-21T00:11:33+5:302017-08-21T00:11:33+5:30
भारतीय परंपरेनुसार श्रावण आमवश्येला शेतकरी वर्षभर राबणाºया बैलाप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा करतात. मात्र यांत्रिकी करणाच्या या युगात येथील ग्रामस्थांनी शेतीत नवनवीन तंत्राचा वापर करायला सुरूवात केल्यानंतर या यंत्राबद्दल कृतज्ञता म्हणून ट्रॅक्टरचा पोळा हा तयपुर्तीचा पोळा म्हणून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे.

१७ वर्षांपासून ट्रॅक्टरपोळ्याची परंपरा
मदन बियाणी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कनेरगावनाका : भारतीय परंपरेनुसार श्रावण आमवश्येला शेतकरी वर्षभर राबणाºया बैलाप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा करतात. मात्र यांत्रिकी करणाच्या या युगात येथील ग्रामस्थांनी शेतीत नवनवीन तंत्राचा वापर करायला सुरूवात केल्यानंतर या यंत्राबद्दल कृतज्ञता म्हणून ट्रॅक्टरचा पोळा हा तयपुर्तीचा पोळा म्हणून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे.
जगाचा पोशिंदा समजल्या जाणाºया बळीराजा सोबत वर्षेभर राबून सर्व कुटूंबाचा उदारनिर्वाहाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाºया बैलाबद्दल कृतज्ञता म्हणून गावोगावी पोळा, बेदूर साजरा करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. शेतीमध्ये उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन तंत्र म्हणून ट्रॅक्टरचा वापर सुरू झाल्याने जशी बैलाबद्दल कृतज्ञता म्हणून तशी ट्रॅक्टर पोळा साजरा केला जातो. पोळा भरविण्याची कल्पना येथील स्वर्गवासी कै. शरद केशराव जोशी यांनी २००५ साली या गावात पहिल्यांदा गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला. त्यावेळी गावात १० ट्रॅक्टर व १० ते १५ बैल जोडी होती. आज घडीला बैलजोडी नसल्याने व ट्रॅक्टरची संख्या जास्त असल्याने ही परंपरा प्रति वर्षाने वाढत आहे. या ठिकाणी ट्रॅक्टर पोळा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलाप्रमाणे ट्रॅक्टरला सजवून त्यांना एकाच ठिकाणी तोरणाखाली उभे करून गावातील मानकरी व पुजारी रवींद्र जोशी यांच्या हाताने पूजा करून पोळा साजरा केला जातो. या पोळ्यात गावातील सर्व धर्माचे ग्रामस्थ तसेच सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस मोठी उत्साहात भाग घेतात. ट्रॅक्टर पोळ्याची गावातून मिरवणूक काढल्या जाते. घरोघरी ट्रॅक्टरची बैलाप्रमाणे पुजा केली जाते. कनेरगाव नाका हे गाव अकोला- हैदराबाद राज्य मार्गावर असून विदर्भ- मराठवाड्याची सीमा असल्याने अल्पवधीतच इथला हा आगळा वेगळा पोळा आदी परिसरात नंतर वाशिम व हिंगोली जिल्ह्यात कुतुहलाचा विषय बनला आहे. लांबलांबून हा पोळा पाहण्यासाठी परिसरातून नागरिकांची गर्दी होत आहे. आज घडीला गावात जवळपास ५० ते ६० ट्रॅक्टर आहेत.