शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पंचपीठाची परंपरा कायम राहणार

By admin | Updated: August 31, 2014 01:10 IST

उदगीर : पंचपीठे ही वीरशैव धर्माचे संस्थापक असून सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ आहे़ कितीही संकटे आली तरी आम्ही धर्मपरंपरेचे पाईक असून पंचपीठाची धर्मपरंपरा यापुढेही नि:संदिग्धपणे कायम राखू,

उदगीर : पंचपीठे ही वीरशैव धर्माचे संस्थापक असून सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ आहे़ कितीही संकटे आली तरी आम्ही धर्मपरंपरेचे पाईक असून पंचपीठाची धर्मपरंपरा यापुढेही नि:संदिग्धपणे कायम राखू, अशी ग्वाही जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी गुरुवारी येथे दिली़उदगीरच्या राजराजेश्वरी देवी मंदिरात महिनाभरापासून श्रावणमास अनुष्ठान सोहळा सुरु होता़ त्याचा समारोप बुधवारी करण्यात आला़ यावेळी डॉ़शिवलिंग शिवाचार्य महाराज, मठाधीश शंभुलिंग शिवाचार्य महाराज, सिद्धलिंग शिवाचार्य, शिवमुर्ती शिवाचार्य, बसवलिंग स्वामी, निलकंठलिंग शिवाचार्य, गुरुलिंग शिवाचार्य, गुरुपादप्पा स्वामी, रेवणसिद्ध शिवाचार्य, रुद्रपशुपती, गुरुमूर्ती शिवाचार्य, कनकट्टे महाराज, राजेश्वर शिवाचार्य या पीठाधीशांसह आ़शंकरअण्णा धोंडगे, ओमप्रकाश पोकर्णा, डॉ़सुधाकर भालेराव, वसंतराव चव्हाण, माजी खा़ गंगाधर कुंटूरकर व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व रामेश्वर निटुरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले़ अनुष्ठान सोहळ्यादरम्यान गणपतराव कदम गुरुजी यांचे शिखामणी ग्रंथावर प्रवचन झाले होते़ त्यावर आधारित घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या भाविकांना जगद्गुरुंच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले़ सूत्रसंचालन प्रा़मल्लेश झुंगा स्वामी यांनी केले़ कार्यक्रमास उदगीरसह नांदेड, बीदर, उस्मानाबाद, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील भाविक उपस्थित होते़ (वार्ताहर)यावेळी जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य यांनी अनुष्ठान हे मानवजातीच्या कल्याणासाठीच असल्याचे सांगून जीवनात सुख, शांती व समृद्धतता नांदावी, अशी अपेक्षा व्यक्त केली़ डॉ़शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी अनुष्ठानाचे महत्व विषद करुन मानवी जीवनातील आचरणाविषयी उपदेश केले़ तसेच समाजाला एकत्रित बांधण्याचा दुआ जगद्गुरु असून, पाचही जगद्गुरुंनी एकत्र येऊन मानवी कल्याणासाठी कार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले़