‘सेट’मध्ये रसायनशास्त्र, भूगोल विभागाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST2021-04-09T04:05:36+5:302021-04-09T04:05:36+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सेट’चा निकाल बुधवारी रात्री घोषित झाला. यामध्ये रसायनशास्त्र विभागाचे १२ विद्यार्थी, तर ...

The tradition of chemistry and geography continues in the set | ‘सेट’मध्ये रसायनशास्त्र, भूगोल विभागाची परंपरा कायम

‘सेट’मध्ये रसायनशास्त्र, भूगोल विभागाची परंपरा कायम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सेट’चा निकाल बुधवारी रात्री घोषित झाला. यामध्ये रसायनशास्त्र विभागाचे १२ विद्यार्थी, तर भूगोल विभागाचे ७ विद्यार्थी पात्र झाले आहेत. आजपर्यंत रसायनशास्त्र विभागाचे ५०० हून अधिक विद्यार्थी सेट, नेट, गेट मध्ये यशस्वी झाले आहेत. यापैकी अनेक जण ‘एनसीएल’ यासारख्या राष्ट्रीय संस्थांमध्ये संशोधन करीत आहेत, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. मच्छिंद्र लांडे यांनी दिली. पात्र विद्यार्थ्यांमध्ये नरेंद्र सुरसे, कृष्णा लाठी, रोहिनी अंबुरे, अमोल कुटे, लक्ष्मण खराबे, गणेश देशमाने, सोमनाथ ढवळे, प्रियंका चापकानडे, आकाश टापरे, राहुल भक्ते, कविता चव्हाण, अशोक भोसले आदींचा समावेश आहे.

भूगोल विभागातील हरिभाऊ विठोरे, प्रतीक्षा मोहिते, मेघा कुलकर्णी, आकाश गिरे, संभाजी ढगे, धनश्री ढवळकर व बापू गुजर हे विद्यार्थी पात्र ठरले असून आजपर्यंत ३६ विद्यार्थी सेट, नेट मध्ये पात्र ठरले आहेत, असे विभागप्रमुख डॉ. मदनलाल सूर्यवंशी सांगितले.

Web Title: The tradition of chemistry and geography continues in the set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.