व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून निगेटिव्ह अहवाल दर्शनी भागात लावावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:07 IST2021-06-09T04:07:00+5:302021-06-09T04:07:00+5:30
सोयगांव : बाजारपेठ सुरु ठेवून कोरोनाची तिसरी लाट थांबवायची आहे, त्याकरिता स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी व ...

व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून निगेटिव्ह अहवाल दर्शनी भागात लावावा
सोयगांव : बाजारपेठ सुरु ठेवून कोरोनाची तिसरी लाट थांबवायची आहे, त्याकरिता स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी व आपला निगेटिव्ह अहवाल दर्शनी भागात लावावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांनी केले आहे.
सोयगांव येथील तहसील कार्यालयात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.८) पार पडली. यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, सपोनि सुदाम सिरसाट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉ. देवडे, न. प. मुख्याधिकारी सुरे, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांची उपस्थिती होती. सोयगांव तालुक्यात दुसरी लाट लवकर आटोक्यात आली आता तिसऱ्या लाटेचा सामना करायचा आहे. त्यात अनलॉक झाल्यामुळे बाजारपेठ सुरू ठेवून ही तिसरी लाट रोखण्याचे मोठे आवाहन आहे. त्याकरिता सर्व व्यापारी, कामगार व कुटुंबीय या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट करणे गरजेचे आहे.
-----
लसीकरण करण्याची मागणी
भाजीपाला, फळविक्रेते यांना जागा निश्चित करून द्या, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, व्यापारी, कामगार व कुटुंबीयांचे लसीकरण लवकरच करण्यात यावे, अशा सूचना व्यापाऱ्यांनी मांडल्या. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन, उपाध्यक्ष निकेश बिर्ला, सचिव प्रमोद रावणे, विष्णू दुसाने, आकाश वरकड, अभय कोटेचा, भूषण जैन, सतीश मंडवे, राजू एलीस यांची उपस्थिती होती.
---