जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:14 IST2018-11-17T22:14:29+5:302018-11-17T22:14:47+5:30
करमाड: व्यापाºयांना भविष्यात व्यापार टिकवून ठेवायचा असेल तर यापुढे भविष्य काळात येणाºया संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, ...

जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र यावे
करमाड: व्यापाºयांना भविष्यात व्यापार टिकवून ठेवायचा असेल तर यापुढे भविष्य काळात येणाºया संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले.
औरंगाबाद तालुका व शहर व्यापारी महासंघाच्या वतीने करमाड येथे आयोजित दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी अध्यक्ष अजय शहा, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सचिव लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष हरसिंग गिल्हाडी, मराठवाडा चेंबर्स आॅफ कॉमर्सचे महासचिव राकेश सोनी, तालुकाध्यक्ष कल्याण उकर्डे, शहराध्यक्ष रामेशराव आघाडे, पंचायत समिती सभापती ताराबाई उकर्डे, तुकाराम महाराज तारो, उपसरपंच दत्तात्रय उकर्डे उपस्थित होते.
काळे म्हणाले की, राज्यातील शेतकºयांवर दुष्काळाचा डोंगर कोसळला आहे. तरी व्यापाºयांनी शेतकºयांना यापुढे काही दिवसांची सवलत देवून त्यांच्या प्रसंगावर सहकार्य करून त्यांना पाठबळ द्यावे. यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी यश मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास भावराव मुळे, दामू करमाडकर, विठ्ठल कोरडे, आबासाहेब भोसले, गणेश तारो,कृउबा संचालक दत्तूलाला तारो, नारायणराव मते,सुरेश भुतडा,भगवान मुळे, बालाप्रसाद भुतडा, सचिन कर्णावट जनार्धन मुळे,रवी पाटील,कृष्णा पोफळे यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाड व्यापारी महासंघाचे राहुल कोरडे,ज्ञानेश्वर उकर्डे, मनीष भुतडा,सचिन तारो,यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब भोसले यांनी केले.