व्यापारी महासंघ १०० एकरवर उभारणार संकुल
By Admin | Updated: August 24, 2016 00:49 IST2016-08-24T00:32:27+5:302016-08-24T00:49:13+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद ए टू झेड पर्यंतच्या सर्व क्षेत्रातील होलसेल विक्रेत्यांना एकत्र आणून जिल्हा व्यापारी महासंघ होलसेल मार्केट (व्यापारी संकुल) उभारणार आहे.

व्यापारी महासंघ १०० एकरवर उभारणार संकुल
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
ए टू झेड पर्यंतच्या सर्व क्षेत्रातील होलसेल विक्रेत्यांना एकत्र आणून जिल्हा व्यापारी महासंघ होलसेल मार्केट (व्यापारी संकुल) उभारणार आहे. यासाठी १०० एकर जागेचा शोध घेणे सुरू असून महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराबाहेरील चार ठिकाणी पाहणी केली आहे.
पर्यटनासोबत औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद शहरातील व्यापार मात्र विखुरलेला आहे. यातही होलसेल व्यापार एकाच ठिकाणी नसल्याने मराठवाड्यातून येथे खरेदीसाठी येणारे व्यापारी, उद्योगांना शहरभर फिरावे लागते. यामुळे वेळ व पैसा जास्त लागतो. पुणे, मुंबईत एकाच ठिकाणी सर्व सामान मिळत असल्याने मराठवाड्यातील व्यापारी या महानगरात खरेदीसाठी जाणे पसंत करतात. औरंगाबादेतील होलसेल व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसायवृद्धीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाने ‘व्यापारी संकुल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १०० एकर जागेवर हे संकुल उभारण्यात येईल. याकरिता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग व नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एकाच ठिकाणी जमीन घेण्यासाठी चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासमवेत जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक झाली. बैठकीत होलसेल मार्केटचा प्रस्ताव महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी मांडला. शहा यांनी सांगितले