सीमोल्लंघनासाठी शहरवासीय सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:36 IST2017-09-30T00:36:46+5:302017-09-30T00:36:46+5:30
सीमोल्लंघन करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले असून शनिवारी विजयादशमी जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे

सीमोल्लंघनासाठी शहरवासीय सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सीमोल्लंघन करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले असून शनिवारी विजयादशमी जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राजाबाजार व कर्णपुरा येथून बालाजीची रथयात्रा, तर चौराहात बालाजीची पालखी काढण्यात येणार आहे.
राजाबाजार येथील बालाजी मंदिरातून सकाळी ९ वाजता बालाजी भगवंतांचा रथ निघणार आहे. किराणा चावडी, मछली खडक, गुलमंडी, पानदरिबा, सराफा रोड, शहागंजमार्गे रथयात्रा राजाबाजारातील मंदिरात पोहोचणार आहे.
चौराहा येथील हरलाल श्यामलाल बालाजी मंदिरात पंचधातूची बालाजीची मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे ३५० वर्षे जुनी आहे. विजयादशमीनिमित्त या मंदिरातून सायंकाळी ६ वाजता बालाजीची पालखी काढण्यात येणार आहे. चौराहातून राजाबाजार, पानदरिबा, मछली खडक, सुपारी हनुमान मंदिर, खाराकुंवामार्गे पालखी पुन्हा चौराहातील मंदिरात येणार आहे. त्यानंतर आरती करण्यात येणार आहे.
कर्णपुरा येथून सायंकाळी ६.३० वाजता बालाजीची रथयात्रा काढण्यात येणार आहे. बालाजी मंदिरातून रथ निघून यात्रामार्गे पंचवटी चौकात आणला जातो. तेथे आरती करून सीमोल्लंघन करण्यात येईल. यात्रामार्गे पुन्हा रथ मंदिरात आणण्यात येईल.