कामठा येथे तुंबळ हाणामारी

By Admin | Updated: April 13, 2015 00:47 IST2015-04-13T00:44:49+5:302015-04-13T00:47:40+5:30

तुळजापूर : प्रार्थनास्थळ, धार्मिक स्थळांवर दगडफेक करण्यासह आपापसात तुंबळ हाणामारी केल्याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून ८३ जणाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

Tough clash at Kamatha | कामठा येथे तुंबळ हाणामारी

कामठा येथे तुंबळ हाणामारी


तुळजापूर : प्रार्थनास्थळ, धार्मिक स्थळांवर दगडफेक करण्यासह आपापसात तुंबळ हाणामारी केल्याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून ८३ जणाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास कामठा येथे घडली असून, पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे़
कामठा येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास दोन गटात दगडफेकीसह तुंबळ हाणामारी झाली़ प्रार्थनास्थळ व धार्मिक स्थळाच्या विटंबनेवरून हा वाद झाल्याचे समजते़ घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस ठाण्यातील पोउपनि शाम बुवा व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून जमाव पांगविला होता़ त्यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन विधाते, पोनि ज्ञानोबा मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले़ या प्रकरणी इलाही युसूफ शेख यांच्या फिर्यादीवरून शरद रामकृष्ण जमदाडे, सुनिल रामकृष्ण जमदाडे, शशिकांत रामकृष्ण जमदाडे, औदुंबर जयसिंग जमदाडे, आनंद जमदाडे, बळीराम वसंत जमदाडे, सुधीर शामराव जमदाडे, नेताजी नाना जमदाडे, श्रीहरी रामकृष्ण जमदाडे, वसंत गणपत जमदाडे, बापू फुलचंद जमदाडे, महेश भारत बचुटे, राजेंद्र रामराव जमदाडे, आकाश उर्फ बाळू आत्माराम जमदाडे, ज्ञानेश्वर अच्युत जमदाडे, परमेश्वर शहाजी जमदाडे, किरण कुबेर जमदाडे व इतर १५ ते २० जणाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर दुसऱ्या गटातील महादेव राजेंद्र जमदाडे यांनी कामठा येथील धार्मिक स्थळांची विटंबना, दगडफेक करून मारहाण केल्याची फिर्याद तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून इरफान हासन सय्यद, हनिफ महैबुब शेख, हसन इमाम सय्यद, शब्बीर हासन सय्यद, सादिक रफिक शेख, साहू लतिफ शेख, अब्दुल लतीफ शेख, हमीद अकबर सय्यद, सुलतान महंमद सय्यद, महंमद पापामियाँ शेख, तय्यब पापामियाँ शेख, बाबूलाल वासू सय्यद, कासिम बाबूलाल सय्यद, शब्बीर इमाम सय्यद, जमीर शब्बीर सय्यद, अमीर शब्बीर सय्यद, शमशोद्दीन जिलानी शेख, इलाही युसूफ शेख, रफिक इलाही शेख, आरिफ इलाही शेख, शब्बीर बाबू सय्यद, नबिलाल शब्बीर सय्यद, बाबासाहेब दाऊद शेख, मुस्तफा गालीब शेख, पैगंबर करीम सय्यद, मुबारक युसूफ शेख, बख्तावर रब्बानी शेख, दोलाबी हसन सय्यद, बख्तावर महंमद शेख, रेश्मा इरफान सय्यद (सर्व राक़ामठा) व अकबर पठाण जिल्हाध्यक्ष एमआयएम, उस्मानाबाद व इतर दहा ते पंधरा अशा ४६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणात पोलिसांनी शरद जमदाडे, आकाश जमदाडे, सुनिल जमदाडे, बापू जमदाडे, परमेश्वर जमदाडे, किरण जमदाडे यांना अटक केली आहे़ तपास सपोनि शाम बुवा हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Tough clash at Kamatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.