मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:11 IST2019-04-03T23:11:27+5:302019-04-03T23:11:37+5:30

१४ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी चेलीपुरा परिसरात घडली.

Torture by a relative | मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार

मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार

औरंगाबाद : १४ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी चेलीपुरा परिसरात घडली. आरोपी हा पीडितेचा दूरचा नातेवाईक असून, तो कामधंद्यासाठी शहरात आला होता. याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.


शेख अज्जू शेख युसूफ (२२, रा. परभणी), असे आरोपीचे नाव आहे. चेलीपुरा परिसरातील रहिवासी पीडिता आणि आरोपी तरुण परस्परांच्या ओळखीचे आहेत. तो कामधंद्यासाठी परभणी येथून शहरात आला आहे, तेव्हापासून तो शहागंज भागातील बहिणीच्या घरी राहत आहे. पीडिता त्याच्या नातेवाईकाची मुलगी असल्याने अधून-मधून तो तिच्या घरी जात असे.

मंगळवारी दुपारी पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधून त्याने तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी पीडितेचा भाऊ आणि अन्य नातेवाईक घरी आले तेव्हा पीडितेने या अत्याचाराची माहिती त्यांना सांगितली. यानंतर नातेवाईकांनी पीडितेला घेऊन सिटीचौक पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आरोपी अज्जूविरोधात त्यांनी फिर्याद नोंदविली. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम आणि बलात्काराचा गुन्हा आरोपीविरोधात नोंदविला.

Web Title: Torture by a relative