येसगाव शिवारात महिलेस मारहाण करून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:06 IST2021-05-09T04:06:12+5:302021-05-09T04:06:12+5:30

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २९ एप्रिल २०२१ रोजी मी व माझी मुलगी शेतात काम करीत होतो. दुपारी ...

Torture by beating a woman in Yesgaon Shivara | येसगाव शिवारात महिलेस मारहाण करून अत्याचार

येसगाव शिवारात महिलेस मारहाण करून अत्याचार

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २९ एप्रिल २०२१ रोजी मी व माझी मुलगी शेतात काम करीत होतो. दुपारी चार वाजेच्या सुमारास सतीश काळे व कल्याण पवार यांचे भांडण सुरू झाल्याने फिर्यादी महिलेने त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यातील कल्याण पवार का अडविले म्हणून विशाल पवार, केशव पवार या ठिकाणी आले. त्यांनी महिलेला शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. तर तिच्या मुलीलाही मारहाण करून निघून गेले. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान कल्याण पवार, केशव पवार, विशाल पवार हे शेतावर आले. आणि तिला शिवीगाळ करून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके करीत आहेत.

Web Title: Torture by beating a woman in Yesgaon Shivara