तुती लागवडीत जालना आघाडीवर

By Admin | Updated: July 29, 2015 00:46 IST2015-07-29T00:24:15+5:302015-07-29T00:46:19+5:30

गंगाराम आढाव , जालना तुती लागवडीत जालना जिल्हा मराठवाड्यात आघाडीवर असून, गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीत ही शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून

On top of the cultivation of Tuli cultivation is the lead | तुती लागवडीत जालना आघाडीवर

तुती लागवडीत जालना आघाडीवर

गंगाराम आढाव , जालना
तुती लागवडीत जालना जिल्हा मराठवाड्यात आघाडीवर असून, गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीत ही शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून तुती लागवडीतून १४८ टन रेशिम कोष उत्पादन करून त्याचे सुमारे साडे तीन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी आर. बी. हांदे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
तुती लागवडीसाठी बागायती क्षेत्र असने गरजेचे आहे. जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा, मागील वर्षी अत्यल्प पाऊस झालेला असतानाही. जिल्ह्यातील ७१४ बागायतदार शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. तुतीसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाण्याचे योग्य नियोजन करून ठिबकद्वारे पाणी देवून योग्य प्रमाणात तुतीचे पाने उपलब्ध केले. या शेतकऱ्यांना रेशिम कार्यालयाच्या वतीने २ लाख ५२ हजार २५० अंड पुंज वाटप करण्यात आले. त्यातून शेतकऱ्यांनी शेडनेडच्या माध्यमातून त्याची योग्य निगा राखून सुमारे १४७ टन रेशिम कोष उत्पादन केले.
उत्पादन केलेल्या या रेशिम कोषला बाजारात २५० ते ३०० रूपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळाला. शेतकऱ्यांनी हे कोष कर्नाटक राज्यातील रामनगरम् बाजारात विक्री केले. त्यातून ३ कोटी ६७ लाख ५० हजाराचे उत्पादन झाले.
मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत जालना जिल्ह्याने चार पट उत्पन्न घेवून रेशिम उद्योगात आघाडी मिळविलेली असल्याचे सांगून हांदे म्हणाले की, सन २०१५- १६ मध्ये जिल्ह्याला ३५० हेक्टरचे उद्दीष्ठये देण्यात आलेले आहे. त्यानुसार ११६५ एकर वरील क्षेत्रातील १०५४ शेतकऱ्यांनी अतापर्यंत नाव नोंदणी केलेली असून त्यातून ११ लाख ४५ हजार रूपये शेतकऱ्यांकडून कार्यालयातस प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
तुती लागवड संबंधी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना तुती लागवडी संबधी माहिती दिली जाते. बाग तयार करण्यासंबधी, नेट सेट, आळीचे संगोपण याबाबत प्रशिक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांना काही प्रमाणात अनुदानही उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मनरेगाचाही आधार
४तुती लागवडीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता शेतात लागवड करण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गत वर्षी २५२ लाभार्थींच्या शेतात मनरेगाच्या माध्यमातून लागवड करण्यात आली. त्याचा मोबादला सुमारे ५१ लाख
रूपये वाटप करण्यात आला आहे.
जिल्हा रेशिम कार्यालयाचे काम मराठवाड्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चारपटीने अधिक आहे. त्यामुळेच जिल्हा आघाडीवर आहे. मात्र कार्यालयात इतर जिल्ह्याच्या व कामाच्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी आहे. १ अधिकारी, ५ तांत्रिक कर्मचारी व ३ क वर्गीय कर्मचारी असे एकुण ९ कर्मचारी आहेत. दोन तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एकूण ११ पदे मंजूर असली तरी कामाचा व्याप पाहता या कार्यालयात आणखी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
तुती लागवड ही बागायती क्षेत्रावर अधिक होते. कमी पावसाचा त्यास फटका बसतोच मात्र बागायदार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य वापर केल्यास एकदा लागवड केलेल्या तुतीतून १० ते १५ वर्ष उत्पन्न मिळू शकते. तसेच नेट सेड व ठिबक साठी अनुदानही शेतकऱ्यांना मिळत असल्याने त्याचा मोठा आधार शेतकऱ्यांना होता. त्यामुळे सुशिक्षीत बेरोज युवकांनी तुती लागवडच्या माध्यमातून रेशीम उद्योगात यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: On top of the cultivation of Tuli cultivation is the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.