शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हा परिषदेत अविश्वास आणा, सेनेची हमी मी घेतो; राज्यमंत्री दानवेंचे आश्वासन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 15:11 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला शांत करण्याचा प्रयत्न 

ठळक मुद्देदानवेंसाठी धावले दानवे 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील शिवसेना-काँग्रेस युतीबाबत अविश्वास ठराव आणा, शिवसेनेची हमी मी घेतो, असे आश्वासित करीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जि. प. तील सत्ताकारणावरून आक्रमक झालेल्या भाजप सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी रेल्वेस्टेशन रोडवरील एका हॉटेलात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या मतदारांची बैठक झाली. 

जि.प.मधील शिवसेना-काँग्रेसच्या युतीमुळे भाजपमध्ये खदखद आहे. त्याचे पडसाद राज्यमंत्री दानवे, राज्यमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उमटले. दानवेंसाठी दानवे यांनी धाव घेऊन भाजप सदस्यांना शांत केल्यामुळे महायुतीत सध्या तरी काही मतभेद नसल्याचे दिसते. राज्यमंत्री दानवे यांनी रविवारी जालना, औरंगाबाद येथे दोन बैठका घेतल्या. या बैठकीत जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपच्या सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने जाणीवपूर्वक भाजप सदस्यांना विकास निधी न दिल्याने आमच्या गटांमध्ये विकासकामे झाली नाहीत. याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत असल्याचे मत भाजप सदस्यांनी मांडले.  

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे रविवारी राज्यमंत्री दानवे यांच्या उपस्थितीत भाजपची जिल्हास्तरीय बैठक झाली. बैठकीला म.वि.म.चे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, आ. प्रशांत बंब, शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील सर्व नगरसेवक, जि. प. सदस्य आणि पंचायत समिती सभापती हजर होते. बैठकीत उमेदवार दानवे यांनी मतदान करण्याचे आवाहन भाजप सदस्यांना केले. 

महापौरानंतर, संपर्कप्रमुखांना रोखले शिवसेनेचे संपर्क प्रमुख घोसाळकर यांनीही दानवे यांना मत देण्याचे आवाहन करून युतीधर्म पाळण्याचे आवाहन करताच भाजपचे काही जि. प. सदस्य अचानक संतापून उठले. तुम्ही औरंगाबाद जि. प. मध्ये काँग्रेससोबत आणि जालना जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून भाजपला दूर ठेवता आणि आता भाजपलाच मते मागता हे बरोबर आहे का? असा सवाल सदस्यांनी केला. तसेच आधी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतची युती तोडा आणि मगच मते मागा, असेही सदस्यांनी सुनावले. या प्रकाराने घोसाळकरांची कोंडी झाली. जि. प. मधील काँग्रेससोबतची युती तोडण्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन घोसाळकर यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या रविवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासोबतही चिकलठाण्यातील एका बैठकीत असाच प्रकार घडला होता. 

एमआयएम बहिष्कार टाकणार?एमआयएमचे मतदार या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर खा.इम्तियाज जलील म्हणाले, बहिष्काराबाबत सध्या काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात फक्त अफवा सुरू आहेत. 

महायुतीचे मतदार इगतपुरीलामहायुतीचे मतदार लोणावळा, इगतपुरीला सहलीसाठी जाणार असल्याचे वृत्त आहे. १५ आॅगस्टपासून ते सहलीवर जाणार असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेचे मतदार एका ठिकाणी आणि भाजपचे मतदार दुसऱ्या ठिकाणी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाVidhan Parishadविधान परिषदAurangabadऔरंगाबाद