उद्या दहावीचे विद्यार्थी, पालकांसाठी कार्यशाळा
By Admin | Updated: May 17, 2014 01:13 IST2014-05-17T01:02:40+5:302014-05-17T01:13:00+5:30
औरंगाबाद : लोकमत व कॉम्पिटिशन पॉइंटतर्फे दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘फलश्रुती २०१४’ ही कार्यशाळा १८ मे रोजी लोकमत भवन येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

उद्या दहावीचे विद्यार्थी, पालकांसाठी कार्यशाळा
औरंगाबाद : लोकमत व कॉम्पिटिशन पॉइंटतर्फे दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘फलश्रुती २०१४’ ही कार्यशाळा १८ मे रोजी लोकमत भवन येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कॉम्पिटिशन पॉइंटचे प्रा. राजन वाळवे ‘बदलते शैक्षणिक धोरण’, प्रा. जय ‘करिअरच्या विविध संधी’ आणि संतोष कारले ‘करिअर कौन्सिलर’ यावर मार्गदर्शन करतील. बोर्डाचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षा यांच्यात योग्य सांगड कशी घालावी याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना वेळीच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रचंड तणावात असतात. जेईई मेन, अॅडव्हान्स, आयआयटी, एनआयटी, पीएमटी, एआयआयएमएस, एसएटी आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर यश आपल्याच मुठीत असते. या स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जाता येईल? याबाबत लोकमतने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉ सोडत ठेवण्यात आली आहे. एकूण दहा बक्षिसे यावेळी काढण्यात येतील. कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य आहे. विद्यार्थी व पालकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी लोकमत भवन अथवा ९८८११९६६७०/ ९९२१०३०७०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.