बाळासाहेब पवार अध्यासनतर्फे उद्या वेबिनार
By | Updated: November 26, 2020 04:12 IST2020-11-26T04:12:21+5:302020-11-26T04:12:21+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकार महर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्रातर्फे ‘वातावरणातील बदल व जल व्यवस्थापन’ या ...

बाळासाहेब पवार अध्यासनतर्फे उद्या वेबिनार
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकार महर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्रातर्फे ‘वातावरणातील बदल व जल व्यवस्थापन’ या विषयावर गुरुवारी मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह मार्गदर्शन करणार आहेत. सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवारी सकाळी ११ ते १ दरम्यान सदर वेबिनार होणर आहे. प्रकुलगुरू डॉ. शाम शिरसाठ अध्यक्षस्थानी असतील. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, उद्योजक मानसिंह पवार, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदी वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत.