शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

आवक वाढल्याने टोमॅटोचे कॅरेट हजारावरून दोनशेवर; शेतकऱ्यांनी जालना महामार्ग रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:07 IST

पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली आणि घसरले दर; पोलिसांनी धाव घेत मार्ग केला मोकळा

- श्रीकांत पोफळेकरमाड : जुलै महिन्यापासून करमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची खरेदी-विक्री सुरू आहे. मात्र, अचानक टोमॅटोची आवक १० पटीने वाढल्याने बाजार समितीतील टोमॅटो लिलावात दर कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन लिलाव बंद केला व त्यांनी जवळपास १० मिनिटे जालना महामार्ग अडवला. करमाड पोलिसांनी धाव घेत तत्काळ जालना महामार्ग मोकळा करून दिला. सभापती राधाकिसन पठाडे संचालकांसह हजर झाले व त्यांनी लिलाव पुन्हा सुरू करून दिला.

करमाड बाजार समितीत रोज २ ते ३ हजार कॅरेट टोमॅटो विक्रीला येत असताना शेतकऱ्यांना मालाच्या दर्जानुसार प्रति कॅरेट ६०० ते १००० पर्यंत दर मिळत होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी आले. त्यामुळे गुरुवारी अचानक २० हजार कॅरेट टोमॅटोची आवक झाली. जवळपास १० पटीने आवक वाढल्याने बाजार समितीतील व्यापाऱ्यांची क्षमता टोमॅटो खरेदीसाठीची यंत्रणा व वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दर कमी केले. टोमॅटोच्या प्रति कॅरेटला २०० रुपये दर बोली लागल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला. मात्र, इतर ठिकाणी दर कमी होत नाही. मग करमाड बाजार समितीत भाव का कमी करता, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित करत लिलाव बंद करून अचानक जालना महामार्गाकडे धाव घेऊन जालना रोड रोखला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्ग मोकळा करून दिला.

नियोजन करणे शक्य झाले नाहीमालाची मागणी आहे ही गोष्ट खरी आहे. मात्र, करमाड बाजार समितीत अचानक आवक दहा पटीने वाढल्याने येथील व्यापाऱ्यांकडे साठवणुकीसाठी कॅरेट, वाहतुकीच्या गाड्या काहीच उपलब्ध होईना. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त टोमॅटो आल्याने व्यापाऱ्यांना नियोजन करणे शक्य झाले नसल्याने अचानक दर कमी झाला.-इलियास बेग, (अध्यक्ष अडत व्यापारी संघटना, करमाड)

खरेदी सुरळीतपावसाने उघडीप दिल्याने काल आणि आज अचानक वीस हजारांपेक्षा जास्त कॅरेट टोमॅटो आले, त्यामुळे व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध होत नसल्याने त्यांनी लिलावात कमी बोली लावली. मात्र, आम्ही शेतकरी व्यापारी यांच्यात मध्यस्थी करून खरेदी सुरळीत सुरू करून दिली.-राधाकिसन पठाडे, सभापती बाजार समिती, संभाजीनगर

हा तर शेतकऱ्यांवर अन्यायइतर कुठल्याही मार्केटमध्ये टोमॅटोचे भाव इतके कमी झालेले नाहीत. मात्र करमाड येथील व्यापाऱ्यांनी भाव कमी केले हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. बाजार समितीने याकडे लक्ष देऊन इतर मार्केट पेक्षा करमाडला कुठल्याही परिस्थितीत भाव कमी मिळू नये याची दक्षता घ्यावी, असे मत बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी आणलेले अरुण सुखदेव भोसले, नवनाथ बद्री हिवाळे, बाबासाहेब पोफळे, कल्याण कचकुरे, ज्ञानेश्वर इथर, कल्याण पोफळे आदी शेतकऱ्यांनी लोकमत कडे व्यक्त केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रTomatoटोमॅटो