‘फुड फॉर मुड’ मध्ये लज्जतदार पदार्थ शिकण्याची आज संधी
By Admin | Updated: June 7, 2014 00:26 IST2014-06-06T23:26:24+5:302014-06-07T00:26:59+5:30
हिंगोली : गृहिणींसाठी ‘लोकमत सखीमंच’ तर्फे एका उत्तम कार्यशाळेचे आयोजन ७ जून रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले असून हा कार्यक्रम शहरातील नाईकनगर भागातील राष्ट्रवादी भवन येथे होणार आहे. ‘
‘फुड फॉर मुड’ मध्ये लज्जतदार पदार्थ शिकण्याची आज संधी
हिंगोली : गृहिणींसाठी ‘लोकमत सखीमंच’ तर्फे एका उत्तम कार्यशाळेचे आयोजन ७ जून रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले असून हा कार्यक्रम शहरातील नाईकनगर भागातील राष्ट्रवादी भवन येथे होणार आहे. ‘फुड फॉर मुड’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेफ समीर दामले प्रात्यक्षिके दाखवून महिलांना खास टिप्स देणार आहेत.
गृहिणींचे स्वयंपाक घराशी अगदी जवळचे नाते असते. स्वयंपाक घराची क्वीन समजल्या जाणाऱ्या गृहिणींना नेहमी काही ना काही नवीन पदार्थ बनवावा आणि तो आपल्या कुटुंबियांना खाऊ घालावा, असे वाटत असते; परंतु सर्वांचे मुड जपत जे पदार्थ बनवावे लागतात त्यात मात्र गृहिणींची तारेवरची कसरत होत असते. या करिताच गृहिणींसाठी दररोज कोणता पदार्थ बनवावा अथवा पारंपरिक पदार्थात काय बदल करावा? हा प्रश्न महिलांच्या कायमच समोर उभा राहत असतो. या प्रश्नाचे उत्तर ‘फुड फॉर मुड’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘लावण्य ब्यूटी पार्लर’, ‘युवराज फॅशन ज्वेलर्स’ आणि ‘हिंगोली अर्बन’ यांनी स्वीकारले आहे.
कार्यक्रमास येताना सखीमंच सदस्यांनी ओळखपत्र सोबत आणावे. लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. या कार्यक्रमास सदस्यांनी वेळेवरच उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)