शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आज सचखंड येथे नगरकीर्तन

By admin | Updated: October 7, 2014 00:13 IST

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड मातासाहिब देवाजींच्या तीन दिवसीय जन्मोत्सव कार्यक्रमाचा समारोप ७ आॅक्टोबर रोजी होणार असून दुपारी दोन वाजता मातासाहिब गुरुद्वारा ते सचखंड नगरकीर्तन काढण्यात येणार आहे.

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेडमातासाहिब देवाजींच्या तीन दिवसीय जन्मोत्सव कार्यक्रमाचा समारोप ७ आॅक्टोबर रोजी होणार असून दुपारी दोन वाजता मातासाहिब गुरुद्वारा ते सचखंड नगरकीर्तन काढण्यात येणार आहे. या नगरकीर्तनात घोड्यांसह निशानसाहिबही सहभागी होणार आहेत.मातासाहिब देवाजींच्या ३३३ व्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मातासाहिब गुरुद्वारा मुगट येथे आयोजन केले होते. ५ आॅक्टोबर रोजी प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात सकाळ व सायंकाळी विविध नामवंत रागी जत्थ्यांनी आपली हजेरी लावली. यानिमित्त ६ आॅक्टोबर रोजी घोड्यांच्या शर्यतीचेही आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या घोडस्वारांनी प्रदर्शन केले. ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कीर्तन समागमाचे आयोजन केले आहे. यात भाई चमनजितसिंघजी लाल, ग्यानी पिंदरपालसिंघजी कथाकार, भाई अमरजितसिंघजी पटीयाला यांची हजेरी लागणार आहे. दुपारी दोन वाजता गुरुद्वारा मातासाहिब येथील कार्यक्रमाचे समापन करुन सचखंडकरिता नगरकीर्तन काढण्यात येणार आहे. हे नगरकीर्तन हिराघाट, त्रिकुट, माळटेकडी, महाराणा प्रताप चौक, अण्णाभाऊ साठे चौक, भगतसिंघरोड, जुना मोंढा, गुरुद्वारा चौरस्ता मार्गे सचखंड येथे येणार आहे. या नगरकीर्तनात निशानसाहिब, गुरुसाहिबांचे घोडे, कीर्तनी जत्थे, भजनी मंडळ, गतका आखाडे सहभागी होणार आहेत. पंजाबमधून आलेले विविध दल आपल्या घोडस्वारांसह नगरकीर्तनात राहणार आहेत. या नगरकीर्तनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुद्वारा मातासाहिबचे जत्थेदार संतबाबा प्रेमसिंघजी, गुरुद्वारा लंगरसाहिबचे जत्थेदार संतबाबा बलविंदरसिंघजी, संतबाबा नरेंद्रसिंघजी यांनी केले आहे.