आज ४६ केंद्रांवर ‘एमएच- सीईटी’

By Admin | Updated: May 5, 2016 01:28 IST2016-05-05T01:25:13+5:302016-05-05T01:28:51+5:30

औरंगाबाद : वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणारी ‘एमएच-सीईटी’ गुरुवारी (दि. ५ मे) शहरात ४६ केंद्रांवर होणार असून,

Today, 'MH-CET' at 46 centers | आज ४६ केंद्रांवर ‘एमएच- सीईटी’

आज ४६ केंद्रांवर ‘एमएच- सीईटी’


औरंगाबाद : वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणारी ‘एमएच-सीईटी’ गुरुवारी (दि. ५ मे) शहरात ४६ केंद्रांवर होणार असून, या परीक्षेसाठी १७ हजार २७३ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती या परीक्षेचे संपर्क अधिकारी डॉ. एम. एस. बेग यांनी दिली.
सकाळच्या सत्रातील १० वाजता सुरू होणाऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना सकाळी ९.१५ वाजेच्या आत परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. तसेच दुपारी ३.०० वाजता होणाऱ्या पेपरसाठी दुपारी २.१५ वाजेच्या आत परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये वेळेच्या आत पोहोचावे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहराच्या विविध शाळा, महाविद्यालयांत एमएच-सीईटीसाठी परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. रोजाबागमधील मौलाना आझाद महाविद्यालयापासून ते सातारा परिसरातील एमआयटी आणि कांचनवाडी येथील छत्रपती शाहू शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांत व्यवस्था करण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी मंगळवारी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणही पार पडले. जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे या परीक्षेच्या जिल्ह्याच्या प्रमुख आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के आणि डॉ. अजित दामले हे विभागीय अधिकारी आहेत. याशिवाय तीन अधिकारी हे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. सुमारे दीड हजार अधिकारी आणि कर्मचारी हे परीक्षेसाठी काम करणार आहेत.

Web Title: Today, 'MH-CET' at 46 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.