सखीमंच सदस्यांसाठी आज ‘हसवा फसवी’

By Admin | Updated: December 21, 2014 00:06 IST2014-12-20T23:47:17+5:302014-12-21T00:06:55+5:30

जालना : लोकमत सखीमंच व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने धम्माल विनोदी ‘हसवा फसवी’ हे नाटक आज २१ डिसेंबर रोजी मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात

Today, 'Haseva Fakabi' for Rakhiman members | सखीमंच सदस्यांसाठी आज ‘हसवा फसवी’

सखीमंच सदस्यांसाठी आज ‘हसवा फसवी’


जालना : लोकमत सखीमंच व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने धम्माल विनोदी ‘हसवा फसवी’ हे नाटक आज २१ डिसेंबर रोजी मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सायंकाळी पाच आयोजित केले आहे.
लोकमतने महिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून संखीमचंच्या माध्यमातून अनेक बहरदार कार्यक्रम घेतलेले आहेत.याच धर्तीवर पुष्कर श्रोत्री अभिनित हसवा फसवी हे धमाल विनोद नाटकाची मेजवाणी सखीमंच सदस्यांना आज मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित यांनी प्रायोजकत्व स्वीकारले असून, कार्यक्रमास येताना सखीमंच सदस्यांनी आपले ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. तसेच लहान मुलांनासुद्धा प्रवेश मिळणार नसल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today, 'Haseva Fakabi' for Rakhiman members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.