आजपासून लोकमत सखीमंच सदस्य नोंदणीला सुरुवात

By Admin | Updated: February 27, 2016 00:24 IST2016-02-27T00:22:54+5:302016-02-27T00:24:55+5:30

परभणी : लोकमतच्या सखीमंच सदस्य नोंदणीला २७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे़

From today on, the beginning of registration of Lokmat Rakhimanch members | आजपासून लोकमत सखीमंच सदस्य नोंदणीला सुरुवात

आजपासून लोकमत सखीमंच सदस्य नोंदणीला सुरुवात

परभणी : लोकमतच्या सखीमंच सदस्य नोंदणीला २७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे़ नोंदणीसाठी शहरात विविध ठिकाणी केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्रातून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नोंदणी होणार आहे़
महिलांच्या कलागुणांना वाव देणारे एक हक्काचं व्यासपीठ म्हणून लोकमत सखीमंच मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहे़ या मंचच्या माध्यमातून महिलांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच प्रबोधन आणि बौद्धिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते़ यावर्षी सखीमंच सदस्य नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सखीला युरो कॅसरोल सेट (२ नग, ५७५ रुपये), सखीमंचचे ओळखपत्र, फिटनेस बुक (१९० रुपये), एक लाख रुपयांचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा, राज्यस्तरीय सोडतीद्वारे हुंडाई आय-१० कार जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे़
शहरातील विविध प्रायोजकांद्वारे, सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे सखींसाठी ठेवण्यात आली आहेत़ त्यात गोविंद बालाजीराव डहाळे सराफ यांच्यातर्फे १० भाग्यवान सदस्यांना चांदीचे पैंजन, श्रीसाई बेन्टेक्स ज्वेलरीतर्फे ५ भाग्यवान सदस्यांना १ ग्रॅम गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र, कदम मोबाईल शॉपीतर्फे २ मोबाईल, कुमार हँडलूम, टाईम व्हिजनतर्फे ७ घड्याळ, सद्गुरु ज्वेलर्सतर्फे १ सोन्याचे कानातले़, दोन चांदीचे करंडे, ओंकार बॅग हाऊसतर्फे ५ बॅग, शुभांगी साडी सेंटरतर्फे ५ आकर्षक साडी, सिद्धी कलेक्शनतर्फे १० खरेदी कुपन, लक्ष्मीकांत वस्त्रभांडारतर्फे १० आकर्षक साडी, न्यू सम्राट एंटर प्रायजेसतर्फे मिक्सर, मिल्टन डबे, सोलार वॉटर हिटरतर्फे आकर्षक भेट वस्तू, बिग शॉपिंग मॉलतर्फे १० खरेदी कुपन आदी भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे़ तसेच शहरातील विविध प्रायोजकांकडून मोफत सेवाही मिळणार आहे़
त्यात सौंदर्या ब्युटी पार्लरकडून यु कट किंवा व्ही कट फ्री, मुलचंद भगवानदास अँड कंपनी एमबी रेडीमेडतर्फे खरेदीवर १० टक्के सवलत, राधिका पॅलेसतर्फे २० टक्के सलवत, ब्युटी वर्ल्डतर्फे फेशीयल फ्री, समीक्षा ब्युटी पार्लरतर्फे ब्लीच फ्री, ड्रिम्स ब्युटी पार्लरतर्फे शहनाज फेशीयल फ्री, गोल्डन ग्लो ब्युटी पार्लरतर्फे बेसिक कट फ्री व अ‍ॅरोबिक तीन दिवसीय ट्रेनिंग फ्री, ऐश्वर्या ब्युटी पार्लरतर्फे क्लिनअप फ्री, सचिन फोटोतर्फे ८ बाय १० फोटो फ्री, मनाली ब्युटी पार्लरतर्फे हेअरकट फ्री भेटणार आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात बक्षीसे आणि सलवतींचा लाभ सखीमंच सदस्यांना मिळणार असून, जास्तीत जास्त सदस्यांनी सखीमंच सदस्य नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत सखीमंचतर्फे करण्यात आले आहे़
परभणी शहरातील नोंदणी केंद्र
लोकमत जिल्हा कार्यालय शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ, जलतरणिका संकुल, श्रीसाई बेन्टेक्स ज्वेलरी, गांधी पार्क, नीताताई देशमुख कल्याणनगर, निखिल लेडीज कॉर्नर, गुजरी बाजार, देविका गिफ्ट सेंटर देशमुख हॉटेल, सद्गुरु ज्वेलर्स देशमुख हॉटेल, अर्चना मामडे शिवराम नगर, चंदाराणी लेमाडे लोकमान्यनगर, सुनीता शहाणे रविराज पार्क, उषा मुंडे दत्तधाम परिसर, विजया कातकडे रामकृष्णनगर, अबोली जोशी एकता कॉलनी, लता वाजपेयी शास्त्रीनगर, जयश्री जाधव खानापूरफाटा, वंदना पवार जुना पेडगाव रोड, ड्रिम्स ब्युटी पार्लर, येलदरकर कॉलनी, सविता अग्रवाल हरिप्रसाद मंगलभवन, संगीता महाजन गंगाखेड रोड, वर्षा मोहरीर शिवाजीनगर, सुनीता जाधव पोलिस कॉर्टर, नंदा राठोड खानापूर फाटा, कुसुम पिल्लेवार, संध्या मठपती पोस्ट कॉलनी, गोदावरी खाकरे पिंगळी, सरोज गट्टाणी स्टेशन रोड, सुरेखा सालपे आरके हॉटेल जवळ, राजश्री थोरात लोकमान्यनगर, सुनंदा देशमुख दत्तनगर या ठिकाणी महिलांना नोंदणी करता येईल़

Web Title: From today on, the beginning of registration of Lokmat Rakhimanch members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.