बजाजनगरात आज महेंद्र ऋषीजी म. सा. महाराज यांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:32+5:302021-02-05T04:10:32+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरातील जैनस्थानकात उद्या मंगळवार (दि.२) आगम रत्नाकर युवाचार्य महेंद्र ऋषी महाराज आदिठाणा व साध्वी सुमन प्रभाजी ...

बजाजनगरात आज महेंद्र ऋषीजी म. सा. महाराज यांचे आगमन
वाळूज महानगर : बजाजनगरातील जैनस्थानकात उद्या मंगळवार (दि.२) आगम रत्नाकर युवाचार्य महेंद्र ऋषी महाराज आदिठाणा व साध्वी सुमन प्रभाजी महाराज यांचे शहरातून आगमन होणार असून, सकाळी ९ वाजता प्रवचन होणार आहे. दुसऱ्यादिवशी दीक्षा दिनानिमित्त बुधवार (दि. ३) महेंद्र ऋषी महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
आगम रत्नाकर युवाचार्य महेंद्र ऋषी महाराज यांच्या ४० व्या दीक्षा दिनानिमित्त बजाजनगरातील जैन स्थानकात बुधवार (दि. ३) विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ९ वाजता महेंद्रऋषीजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. या प्रवचनानंतर सकाळी १० वाजता जैन स्थानकाच्या विस्तारित नवीन भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर विमलबाई चोरडिया यांच्यावतीने भाविकांना गौतम प्रसादीचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा जैन समाज बांधव व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन बजाजनगर-पंढरपूर श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया, किशोर राका, चंद्रकांत चोरडिया व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
फोटो क्रमांक -महेंद्र ऋषी महाराज