३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:25 IST2017-08-14T00:25:13+5:302017-08-14T00:25:13+5:30

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे.

Tiwari presided over the 39th Marathwada Sahitya Sammelan | ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तिवारी

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तिवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) रविवारी (दि.१३) झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ‘मसाप’तर्फे दिल्या जाणाºया जीवनगौरव पुरस्कारासाठी मधुकरराव मुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘मसाप’आणि बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २३-२४ डिसेंबर रोजी अंबाजोगाई येथे हे साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे.

Web Title: Tiwari presided over the 39th Marathwada Sahitya Sammelan