तिरुपती एक्स्प्रेसला जालन्यात हिरवी झेंडी
By Admin | Updated: December 14, 2014 00:05 IST2014-12-13T23:46:41+5:302014-12-14T00:05:36+5:30
जालना : औरंगाबाद येथून जालना मार्गे तिरूपतीला जाणाऱ्या तिरुपती एक्स्प्रेसला शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवी झेंडी दाखविली.

तिरुपती एक्स्प्रेसला जालन्यात हिरवी झेंडी
जालना : औरंगाबाद येथून जालना मार्गे तिरूपतीला जाणाऱ्या तिरुपती एक्स्प्रेसला शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवी झेंडी दाखविली.
तिरुपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मराठवाड्यातील भाविकांची गैरसोय होत होती. केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी अनेकवेळा रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून मागील अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या औरंगाबाद- रेणीगुंठा - तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी आ. संतोष दानवे, किशोर अग्रवाल, अर्जुन गेही, देवीदास देशमुख, सतीश जाधव, सुनील चिखले, घनश्याम गोयल, प्रदीप मुथा, सुनील दायमा, अभय करवा, विनोद पाटणी, भास्कर दानवे, सुरेंद्र पित्ती, शिवराज जाधव, सिध्दी मुळे, विजय मित्तल, नरेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते.