कारखाने, संस्थांकडे थकले २३२ कोटी

By Admin | Updated: December 11, 2014 00:41 IST2014-12-11T00:34:55+5:302014-12-11T00:41:27+5:30

विजय मुंडे , उस्मानाबाद तेरणा, तुळजाभवानीसह सहा साखर कारखान्याकडून नोव्हेंबर २०१४ अखेर पर्यंत डीसीसी बँकेचे १८३ कोटी ४३ लाख ३९ हजार रूपये तर विविध १५ संस्थांकडून

Tired of factories and institutions, 232 crores | कारखाने, संस्थांकडे थकले २३२ कोटी

कारखाने, संस्थांकडे थकले २३२ कोटी


विजय मुंडे , उस्मानाबाद
तेरणा, तुळजाभवानीसह सहा साखर कारखान्याकडून नोव्हेंबर २०१४ अखेर पर्यंत डीसीसी बँकेचे १८३ कोटी ४३ लाख ३९ हजार रूपये तर विविध १५ संस्थांकडून ४८ कोटी ४३ लाख ३३ हजार रूपये असे एकूण २३१ कोटी ८६ लाख ७२ हजार कर्जाचे मुद्दल येणे बाकी आहे़ यात सद्यस्थितीत कारखान्यांकडे ११८ कोटी ५९ लाख २० हजार रूपये थकबाकी तर संस्थांकडे १४ कोटी ९६ लाख ९१ हजार रूपयांची थकबाकी आहे़ काही कारखान्यांकडील वसुलीसाठी डीसीसीची न्यायालयीन लढाई सुरू आहे़ तर काही संस्थांनी डीसीसीच्या नोटीसांना चक्क केराची टोपली दाखविली आहे़
जिल्हा मध्यवर्ती बँक असो अथवा साखर कारखाने असोत या दोन्ही संस्था या शेतकऱ्यांच्या कष्टावरच चालतात़ मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी डीसीसी बँक आणि काही थकबाकीदार कारखान्यांमुळेच अडचणीत आले आहेत़ डीसीसी बँकेने तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास दिलेल्या कर्जापैकी (सर्व कारखान्यांकडील कर्जावरील व्याजाची रक्कम मुद्दलाएवढीच झाली आहे) १२७ कोटी ३१ लाख १२ हजार रूपये मुद्दल येणेबाकी असून, सद्यस्थितीत ७४ कोटी ९७ लाख ६३ हजार रूपयांचे कर्ज थकीत आहे़ नळदुर्ग येथील तुळजाभवानी साखर कारखान्याकडून ४८ कोटी ३१ लाख ३० हजार रूपयांचे कर्ज येणेबाकी आहे़ यात थकीत ३५ कोटी ८३ लाख ५० हजार रूपये थकीत आहेत़ हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखान्याकडे २ कोटी १६ लाख २९ हजार रूपयांचे कर्ज थकले आहे़ किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ३ कोटी ९८ लाख ७८ हजार रूपये थकले आहेत़ तर वाशी तालुक्यातील इंदापूर येथील नरसिंह शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे १ कोटी ६३ लाख रूपयांची थकबाकी आहे़ पगार सहकारी पतसंस्थांकडे (कॅक़्रे़क्लिन) च्या २४ संस्थांकडे ५ लाख १० हजार ४२ रूपये, ५५ नागरी सहकारी संस्थांकडे (फिक्स लोन) ९३ लाख ३८ हजार रूपये, ६२ मजूर सहकारी संस्थांकडे १ कोटी ९८ लाख ७८ हजार रूपये, १० औद्योगिक सहकारी संस्थांकडे ५१ लाख ८८ हजार, कळंब येथील खरेदी-विक्री संघाकडे २३ लाख ६९ हजार, दोन ग्राहक भंडारकडे १ लाख ५३ हजार, धाराशिव कुक्कुटपालन संस्थेसह इतर एका संस्थेकडे २० लाख २४ हजार रूपये, दोन मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेकडे ५२ हजार रूपये, उस्मानाबादेतील वसंतदादा दूध उत्पादक संघाकडे ३९ लाख रूपये, तांबेगहाण कर्जात एका संस्थेकडे १ लाख, ८६ हजार, नजरगहाण कर्जात सात संस्थांकडे ५ लाख ७३ हजार, वैयिक्तक कर्जात ३० संस्थांकडे १ कोटी ४५ लाख ६४ हजार, पृथ्वीराज ग्रेप ग्रो़ को़आॅप़सो़लिक़डे ३० लाख, सहा ग्रामोद्योग संघाकडे २ कोटी ६८ ला २८ हजार रूपयांचे कर्जातील मुद्दल थकीत आहे़ वैयक्तिक कर्जातीलही ५ लाख ९६ हजार रूपये थकीत आहेत़ कारखान्यांसह संस्थांकडील कर्जाची एकूण २३१ कोटी ८६ लाख ७२ हजार रूपये येणेबाकी असून, यात १३३ कोटी ५६ लाख ११ हजार रूपये थकबाकी आहे़
जप्तीनंतर कर्जाची वसुली
भूम दूध संघाकडे कारखान्याची जवळपास एक कोटी १४ लाख ८९ हजार रूपयांचे मुद्दल कर्ज होते़ बँकेने सरफेसी अ‍ॅक्टनुसार कारवाई करून एक हेक्टर जमीन ताब्यात घेतली होती़ या जमिनीचा लिलाव करून कर्जाची रक्कम व त्याचे ३३ लाख ५१ हजार रूपयांचे व्याज वसूल केले आहे़ विशेष म्हणजे ही कारवाई होताना साखर कारखान्यांप्रमाणे अडचण न आल्याने डीसीसीला पैसे मिळाले, हे विशेष!
‘भिमाशंकर नील’
पारगाव येथील भिमाशंकर शुगर मिल्सने डीसीसी बँकेकडून कर्ज घेतले होते़ या कर्जातील येणे बाकी असलेले १३ लाख ५९ हजार रूपये कारखान्याने भरले असून, कारखाना डीसीसीच्या कर्जातून मुक्त झाला आहे़ लातूर जिल्ह्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी महाराज सहकारी साखर कारखान्याकडून २ लाख ९० हजार रूपयांची येणेबाकी आहे़
कारखाने, संस्थांवर राजकीय वरदहस्त
डीसीसी बँकेची कर्जे थकीत असलेल्या बहुतांश संस्था या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षाच्या जिल्ह्यातील मोठी नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहेत़ डीसीसी बँकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे़ तरीपरंतु कर्जे वसूल कशी होत नाहीत ? हे न सुटणारे कोडे सर्वसामान्यांना पडले आहे़

Web Title: Tired of factories and institutions, 232 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.